रेल्वेत सोनसाखळी चोरांचा धुमाकुळ; ६ वर्षात ८ कोटींच्या सोनसाखळी चोरीस

२०१८ मध्ये एकूण ३१४ सोनसाखळी चोरीच्या घटनेत १ कोटी ४९ लाख २७ हजार २२२ रुपये किंमतीचा ऐवज चोरीला गेल्याचं दिसून आलं. यातील अवघे चोरी झाले असून फक्त ८० गुन्हे उघड झाले असून ३० लाख ३२ हजार ३४३ रुपयांचा ऐवज परत मिळवण्यात यश आलं आहे.

रेल्वेत सोनसाखळी चोरांचा धुमाकुळ; ६ वर्षात ८ कोटींच्या सोनसाखळी चोरीस
SHARES

मुंबईच्या रेल्वेस्थानक परिसरात भुरट्या चोरांना आवर घालण्यात प्रशासनाला अपयश येत असल्याचं दिसत आहे.  मुंबईच्या विविध रेल्वे स्थानकावर २०१७ आणि २०१८ मध्ये सोनसाखळी चोरीच्या ६५५ घटना घडल्या आहेत. मात्र गुन्हे उकलीचे प्रमाण हे फक्त ४० टक्के असल्याने रेल्वेतील प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून येते. रेल्वेकडे माहितीच्या अधिकाराखाली शकिल अहमद यांनी मागवलेल्या माहितीतून सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांवर प्रकाश पडला आहे. 


८६० गुन्ह्यांची उकल

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी लोहमार्ग पोलीस विभागाकडे २०१३ ते २०१८ या कालावधीत मुंबईच्या उपनगरीय रेल्वे हद्दीत झालेल्या सोनसाखळी चोरीची माहिती मागवली होती. रेल्वेने दिलेल्या माहितीप्रमाणे, मुंबईत १ जानेवरी २०१३ पासून डिसेंबर २०१८ पर्यंत एकूण २०८४ सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.  या सहा वर्षात ८ कोटी २८ लाख २४ हजार ३९९ रुपये किंमतीचा ऐवज चोरी झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.  या नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांपैकी फक्त ८६० गुन्ह्यांची उकल झाली आहे.  पोलिसांना फक्त ३ कोटी ३२ लाख ३९ हजार ९२१ रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात यश आलं आहे.


३४१ चोरीच्या घटना

२०१७  मध्ये एकूण ३४१ सोनसाखळी चोरीच्या घटनेत १ कोटी ४२ लाख ९२ हजार ६३१ रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. यातील फक्त फक्त १२८ गुन्हे उघड झाले असून ४० लाख ३३ हजार  २५९ रुपयांचा ऐवज परत मिळवला आहे. २०१८ मध्ये एकूण ३१४ सोनसाखळी चोरीच्या घटनेत १ कोटी ४९ लाख २७ हजार २२२ रुपये किंमतीचा ऐवज चोरीला गेल्याचं दिसून आलं. यातील अवघे  चोरी झाले असून फक्त ८०  गुन्हे उघड झाले असून ३० लाख ३२ हजार ३४३ रुपयांचा ऐवज परत मिळवण्यात यश आलं आहे. हेही वाचा  -

वडाळा टीटी येथील हत्येचा पाच दिवसानंतर उलगडा

तरुणीसोबत अश्लील चॅटिंग पडलं महागात
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा