लालबागमध्ये आरटीआय कार्यकर्त्यावर हल्ला

 Mumbai
लालबागमध्ये आरटीआय कार्यकर्त्यावर हल्ला

लालबाग - दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी एका आरटीआय कार्यकर्त्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी लालबाग परिसरात घडली. विनोद जैन असे या आरटीआय कार्यकर्त्यांचे नाव असून ते लालबाग परिसरातील राहणारे आहेत. भायखळा येथून ते दुचाकीवरून त्यांच्या घराकडे येत असताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना रस्त्यात थांबवत त्यांच्या पाठीवर चाकूने वार करत पळ काढला. जैन यांनी तात्काळ दुचाकी बाजूला लावत रुग्णालय गाठले. त्यानंतर काळाचौकी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार रुग्णालयात दाखल झालेल्या पोलिसांनी जैन यांचा जवाब नोंदवत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. जैन यांनी अनेक अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासकांचा माहिती अधिकारातून भांडाफोड केला आहे. याच रागातून हा हल्ला झाल्याची माहिती जैन यांनी दिली आहे.

Loading Comments