सचिन वाझेंवर ओपन हार्ट सर्जरी, रुग्णालयात...

निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) यांची ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली आहे.

सचिन वाझेंवर ओपन हार्ट सर्जरी, रुग्णालयात...
SHARES

निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) यांची ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली आहे. कोर्टाच्या परवानगीनंतर वाझेवर मुंबई सेंट्रलमधील वोकहार्ट रुग्णालयात (Wockhardt Hospitals) सर्जरी करण्यात आली. शस्त्रक्रियेसाठी वाझे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाल्याची माहिती कालच त्याच्या वकिलांनी दिली होती.

वाझेच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचं जेजे रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केलं होतं. त्यानुसार सोमवारी सचिन वाझे मुंबई सेंट्रलमधील वोकहार्ट रुग्णालयात दाखल झाले होते. मंगळवारी वाझेंवर ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली.

सचिन वाझेची प्रकृती स्थिर आहे. कार्डिअॅक सर्जन डॉ कमलेश जैन आणि कार्डिओलॉजिस्ट डॉ अंकुर आणि डॉ केदार यांच्या टीमनं वाझेवर शस्त्रक्रिया केली. रुग्णालयाबाहेर सध्या कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने कोर्टात तब्बल दहा हजार पानांची चार्जशीट दाखल केली आहे. यामध्ये सचिन वाझेंनी स्फोटकांची गाडी का ठेवली, त्याची कारणं मिळाली आहेत. सचिन वाझेंनी आपली जुनी ओळख परत मिळवायची होती. स्फोटकांनी भरलेल्या कारचा तपास करून, उत्तम तपास अधिकारी म्हणून पुन्हा लौकिक मिळेल, अशी आशा सचिन वाझेला होती, मात्र इथेच तो फसला आणि जेलमध्ये गेला.

सचिन वाझे हा ख्वाजा युनूस एन्काउंटर प्रकरणात निलंबित झाले होते. मात्र ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर २०२० मध्ये तो परत पोलीस दलात दाखल झाला. वाझेंना थेट क्राईम इन्वेस्टीगेशन युनिट अर्थात CIU चे प्रमुख पद मिळालं.

नव्वदच्या दशकातील ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट‘ अशी ख्याती असलेला सचिन वाझे जवळपास १६ वर्षांनंतर २०२० मध्ये पोलिस दलात परतला होता. मात्र मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर, त्याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं.हेही वाचा

राज्यात महिलांवर होणाऱ्या ८० टक्के अत्याचारामागे परप्रांतीय, मनसेचा दावा

७ लाख रुपयांची ४७५ रेल्वे ई-तिकिटे जप्त, १९ दलालांना बेड्या

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा