चोराला पकडणाऱ्या पोलिसाचा गौरव

 Ville Parle
चोराला पकडणाऱ्या पोलिसाचा गौरव
Ville Parle, Mumbai  -  

सहारा वाहतूक पोलीस विभागात कार्यरत असणाऱ्या पोलीस हवालदार संतोष सातपुते यांच्या बहादुरीबद्दल त्यांचा मंगळवारी सत्कार करण्यात आला. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते सातपुते यांना सन्मानचित्र आणि रोख 25,000 रुपये देऊन गौरविण्यात आले.

15 फेब्रुवारी 2017 रोजी विलेपार्ले येथे संतोष हे ड्युटीवर होते. तेव्हा एका चोराने वयस्कर महिलेची पर्स चोरली आणि पळू लागला. त्यावेळी संतोष सातपुते यांनी त्याला धावत जाऊन रंगेहात पकडले. थोड्याच वेळात विलेपार्ले पोलिसांनी त्या चोराला ताब्यात घेतले. सातपुते यांच्या याच बहादुरीचा गौरव करण्यात आला.

Loading Comments