नवाब मलिकांविरोधात समीर वानखेडे कायदेशीर कारवाई करणार?

नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपावर समीर वानखेडे आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे.

नवाब मलिकांविरोधात समीर वानखेडे कायदेशीर कारवाई करणार?
SHARES

NCB आधिकारी समीर वानखेडे यांनी नोकरी मिळवण्यासाठी फ्रॉड केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांचे आरोप वानखेडे यांनी फेटाळून लावले आहेत. तसंच वानखेडे या प्रकरणी कोर्टात जाणार असल्याची शक्यता आहे. 

नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंचा जन्म दाखला ट्विट करून इथूनच फ्रॉड सुरू झाल्याचं म्हटलं आहे. समीर वानखेडे यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्याविरोधात खोडसाळ आरोप केले जात असल्याचं सांगत त्याला कायदेशीर उत्तर देणार असल्याचं वानखेडे यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वानखेडे यांचा जन्म दाखला ट्विटरवर पोस्ट केला आहे. नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे यानं फर्जीवाडा करून नोकरी कशी मिळवली आहे? हे जातप्रमाणपत्र शेअर करत आणखी एक पोलखोल केली आहे.

एनसीबीच्या बोगस कारवाईवर आणि आघाडी सरकारला बदनाम करण्याच्या समीर दाऊद वानखेडे याच्या मनसुब्यावर नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अनेक पुरावे सादर करत नवाब मलिक यांनी आर्यन खान अंमली पदार्थ कारवाई कशी बोगस आहे आणि आघाडी सरकारला कसं बदनाम केलं जातंय हे पत्रकार परिषद घेत समोर आणलं होतं.

दरम्यान, समीर वानखेडे यांच्यावर सुरू असलेल्या आरोपांची एनसीबीनेही घेतली आहे. पंचानीच वानखेडेंवर आरोप केल्यानं वानखेडेंची खात्यांतर्गत चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. याप्रकरणी एनसीबीने वानखेडेंना दिल्ली मुख्यालयात बोलावलं असून मंगळवारी ते दिल्लीला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.



हेही वाचा

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला नवं वळण; प्रकरण दाबण्यासाठी २५ कोटींची मागणी, धक्कादायक व्हिडीओ समोर

अनन्या पांडेची तिसऱ्यांदा चौकशी होणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा