अंधश्रद्धा म्हणजे अज्ञानच...

दादर - माझी सेवा कराल तर पैशाचा पाऊस पाडेन, शेजारणीनं करणी केलीय, तुझ्यात अलौकिक शक्ती आहे. वाट्टेल त्या थापा मारणारे ढोंगी बुवा आणि बाबा. त्याला बळी पडणारी भोळी-भाबडी जनता. पण या भूलथापांना फसू नका हे सांगण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती नेहमीच प्रयत्न करते. मंगळवारी, चैत्यभूमीवरही जनजागृतीसाठी हा प्रयत्न चित्रांच्या माध्यमातून करण्यात आला.

बुवा-बाबा सामान्यांना चमत्काराच्या नावानं कसं उल्लू बनवतात याची प्रात्यक्षिकंही दाखवण्यात आली. अंधश्रद्धा हे अज्ञानच. त्यामुळे ते मुळापासून नष्ट होणं गरजेचं आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीची त्यासाठी चाललेली धडपड कौतुकास्पदच म्हणावी लागेल.

Loading Comments