विद्यार्थ्यांचे केस वाढले म्हणून शाळेने दिली विचित्र शिक्षा

Vikhroli
विद्यार्थ्यांचे केस वाढले म्हणून शाळेने दिली विचित्र शिक्षा
विद्यार्थ्यांचे केस वाढले म्हणून शाळेने दिली विचित्र शिक्षा
विद्यार्थ्यांचे केस वाढले म्हणून शाळेने दिली विचित्र शिक्षा
See all
मुंबई  -  

शाळेत विद्यार्थ्यांना अमानुषपणे शिक्षा करण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. असाच एक धक्कादायक प्रकार शुक्रवारी विक्रोळीतील के. व्ही. व्ही. म्हणजेच कमल वासुदेव वायकुळे इंग्लिश स्कूल या शाळेत घडला. विद्यार्थ्यांचे केस वाढलेत म्हणून चक्क शाळेनेच विद्यार्थ्यांचे केस विचित्र पद्धतीने कापून त्यांना शिक्षा दिल्याचा प्रकार समोर आला आहे.


शाळेतच कापले विद्यार्थ्यांचे केस

शुक्रवारी सकाळी मुख्याध्यापकांच्या आदेशानुसार पिटीच्या शिक्षकांनी प्रत्येक वर्गात जाऊन पाहणी केली. वारंवार सांगूनही मुलांनी शाळेत केस कापून न आल्यामुळे शिक्षक मिलिंद झनके आणि शिपाई तुषार गोरे यांनी 25 विद्यार्थ्यांचे अर्धवट केस कापले. यामुळे कात्री लागल्याने विद्यार्थ्यांच्या डोक्याला जखमा देखील झाल्या आहेत. 

पाचवी ते आठवी इयत्तेतील ही सर्व मुले असून महिना अखेर असल्याने ही सर्व मुले शाळेतून घरी लवकर आली. तेव्हा हे संपूर्ण प्रकरण समोर आले. या प्रकाराने संतापलेल्या काही पालकांनी विक्रोळी पोलिस ठाण्यात धाव घेऊन शाळेविरोधात तक्रार दाखल केली आहे. पालकांच्या तक्रारीनंतर शिक्षक मिलिंद झनके आणि शिपाई तुषार गोरे यांच्याविरोधात 324, 355 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.