शाळेच्या बेजबाबदारपणामुळे मुलीने गमावले बोट

कांदिवली - ठाकूर इंटरनॅशनल शाळेच्या बेजबाबदारपणामुळे नर्सरीमध्ये शिकणाऱ्या एका मुलीला हाताचे बोट गमवावे लागले आहे. बुधवारची ही घटना आहे. शाळेतील शिक्षिकेने अचानक वर्गाचा दरवाजा बंद केल्याने मुलीचे बोट दरवाज्यात अडकले आणि त्याचे दोन तुकडे झाले. विशेष म्हणजे या मुलीला डॉक्टरकडे घेऊन न जाता तिला वर्गात बसवून ठेवण्यात आले आणि तिच्या घरच्यांना शाळेत बोलावून तिचे तुटलेल बोट पिशवीतून देण्यात आले. ज्यावेळी लहान मुलीला अंधेरीच्या कोकीलाबेन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तेव्हा खुप उशीर झाल्याने बोट पुन्हा जोडू शकत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Loading Comments