दाभोळकर,पानसरे हत्या प्रकरणी स्कॉटलंड यार्डचा मदतीस नकार

 Pali Hill
दाभोळकर,पानसरे हत्या प्रकरणी स्कॉटलंड यार्डचा मदतीस नकार

मुंबई - दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी हत्या प्रकरणाचा तापास करणाऱ्या सीबीआयला स्कॉटलंड यार्डने मदत करण्यास नकार दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात भारत आणि इंग्लंड मध्ये कोणताही करार नसल्याचं सांगत स्कॉटलंड यार्डने मदत करण्यास नकार दर्शवला असल्याची माहिती शुक्रवारी सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात दिली.

दाभोलकर आणि पानसरेंची हत्या ही एकाच बंदुकीने झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र मुंबईच्या एफएसएलचा येथील बॅलेस्टिक रिपोर्ट आणि बेंगळुरू येथील प्रयोगशाळेचा बॅलेस्टिक रिपोर्ट हा वेगळा आल्याने स्कॉटलंड यार्डच्या मदतीचा मार्ग सीबीआयने निवडला होता. स्कॉटलंड यार्डच्या नावावर सीबीआयने या प्रकरणात अनेकदा मुदतवाढ घेतली होती. मात्र आता सीबीआयच्या सगळ्या आशांवर पाणी पडले आहे.

स्कॉटलंड यार्डने मदत न करण्याचे स्पष्ट करताच सीबीआयने अहमदाबाद एफएसएलकडून रिपोर्ट घेतला असून तोच शुक्रवारी कोर्टात सादर करण्यात आला. कोर्टाच्या परवानगीशिवाय हा रिपोर्ट पब्लिश करण्यास कोर्टाने सीबीआयला मज्जाव केला आहे.

Loading Comments