मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेचा रिअॅलिटी चेक

मुंबई - 26/11 च्या मुबंईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 8 वर्ष पूर्ण होतायेत. मात्र या दहशत वादी हल्ल्यानंतरही आपण काही शिकलोय का? मुंबई अजूनही सुरक्षित आहे का? असे एक ना अनेक प्रश्न मुंबईकरांच्या मनात येत असतील. त्याचसाठी ‘मुंबई लाइव्ह’‘नं खास रिअॅलिटी चेक करत खरच मुुंबई सुरक्षित आहे का हे पाहिलं. त्यासाठी गाठलं मुंबईतील प्रसिद्ध असलेली रेल्वे स्थानक. आम्ही 6 रेल्वे स्थानकावर रिअॅलिटी चेक केली मात्र फक्त एका रेल्वे स्थानकाच्या बाजूला लोकांनी जागरूकता दाखवल्याचं आम्हाला दिसून आलंय. त्यामुळे खरच मुंबईकर जागरूक आहेत का?मुंबईची सुरक्षायंत्रणा जागरूक आहे का? हा प्रश्न या निमित्तानं समोर आलाय.

Loading Comments