सत्ताधाऱ्यांचीच पालिकेला खड्ड्यात घालण्याची तयारी?


सत्ताधाऱ्यांचीच पालिकेला खड्ड्यात घालण्याची तयारी?
SHARES

मुंबई - 500 चौरस फुटांच्या घरांचा मालमत्ता कर रद्द होणार आणि 700 चौरस फुटापर्यंतच्या घरांना कर सवलत मिळणार, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. ही सूट आणि सवलत जाहीर करून भविष्यातील कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडण्याची तयारी पालिकेने दाखवली आहे. त्यामुळे आधीच जकात कर रद्द होणार असल्यामुळे सुमारे 7000 ते 7500 कोटी रुपयांचा महसूल कमी होणार आहे. त्यातच मालमत्ता कराचाही महसूल कमी होणार असल्यामुळे या नावाखाली सेना भाजपा महापालिकेला खड्ड्यात घालणार की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबईत 500 चौरस फुटांच्या घरांकडून सुमारे 300 ते 350 कोटी रुपये एवढा महसूल मिळत आहे. पण भविष्यात तो रद्द केल्यास 300 ते 350 कोटींना मुकावे लागेल. शिवाय 700 चौरस फुटापर्यँतच्या घरांना सवलत दिल्यास कोट्यवधी रुपयांचा महसूल घटणार आहे. त्यामुळे महापालिकेचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा