राज्यात ज्येष्ठ नागरिक असुरक्षितच...!

२४६ गंभीर मारहाणीचे, ३५५ जबरी चोरीचे व १०१५ फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. या गुन्ह्यात सर्वात लाजीरवाणी गोष्ट म्हणजे राज्यात २०१७ मध्ये ९ ज्येष्ठ नागरीक महिलांवर बलात्कार झाला आहे.

SHARE

घरातील आधार वड म्हणूनओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आदराने वागवण्याची संस्कृती  महाराष्ट्राची आहे. मात्र मागील काही वर्षात या संस्कृतीचा विसर पडला असून  महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे ज्येष्ठ नागरिकांविरोधात घडत असल्याचे समोर आले आहे. देशातील वरिष्ठ नागरीकांविरोधात नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये सर्वाधीत म्हणजे पाच हजार ३२१ गुन्हे महाराष्ट्रात घडले आहेत. तर मुंबईत ज्येष्ठ नागरिकांबाबत एक हजार११५ गुन्ह्यांची नोंद आहे.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या (एनसीआरबी) २०१५ आणि २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये ज्येष्ठ नागरिकांबाबतच्या गुन्ह्यांत कमालीची वाढ झाली आहे. २०१५मध्ये राज्यात चार हजार ५६१ गुन्हयांची नोंद करण्यात आली आहे. तर २०१६  मध्ये चार हजार ६९४ तर २०१७ मध्ये पाच हजार ३२१ गुन्ह्यांची नोंद असून २०१७ मध्ये राज्यात १५२ ज्येष्ठ नागरीकांच्या हत्याचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. याशिवाय ६६ गुन्हे हत्येचा प्रयत्न, २४६ गंभीर मारहाणीचे, ३५५ जबरी चोरीचे व १०१५ फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. या गुन्ह्यात सर्वात लाजीरवाणी गोष्ट म्हणजे राज्यात २०१७ मध्ये ९ ज्येष्ठ नागरीक महिलांवर बलात्कार झाला आहे. त्या पाठोपाठ केरळामध्ये सर्वाधीक म्हणजे 19 ज्येष्ठ नागरीक महिलांवर बलात्कार घडले आहेत.

मुंबई ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनअनेक पाऊले उचलण्यात आली असली तरी, वरिष्ठ नागरीकांविरोधातील गुन्ह्यांमध्ये देशात मुंबई आघाडीवर आहे. मुंबईत २०१७ मध्ये एक हजार ११५ गुन्हे घडले आहेत. २०१६ मध्ये १२१८ गुन्हे घडले होते, तर २०१४ मध्ये ९४४ व २०१५ मध्ये ११२१ गुन्हे वरिष्ठनागरीकांविरोधात घडले होते. या बहुतांश गुन्ह्यात ज्येष्ठनागरिकांच्या घरात काम करणारे नोकरांचा सहभाग दिसून आला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या