मॅट्रिमोनिअल साईटवरून जाळ्यात ओढून १२ उच्चशिक्षित महिलांचं लैंगिक शोषण

पोलीस गेल्या चार महिन्यांपासून त्याचा शोध घेत होते. आरोपीने उच्चशिक्षित महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी मॅट्रिमोनिअल वेबसाईटवर आपले अनेक खोटे अकाऊंट तयार केले होते.

मॅट्रिमोनिअल साईटवरून जाळ्यात ओढून १२ उच्चशिक्षित महिलांचं लैंगिक शोषण
SHARES

मॅट्रिमोनिअल साईटवरून १२ उच्चशिक्षित महिलांना जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्याला नवी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. महेश उर्फ करण गुप्ता (३२) असं आरोपीचं नाव आहे. महेश मेकॅनिकल इंजिनिअर आहे. 

मालाडमधून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस गेल्या चार महिन्यांपासून त्याचा शोध घेत होते. आरोपीने उच्चशिक्षित महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी मॅट्रिमोनिअल वेबसाईटवर आपले अनेक खोटे अकाऊंट तयार केले होते. महिलांच्या संपर्कात आल्यानंतर तो त्यांना पब, रेस्तराँ किंवा मॉलमध्ये भेटण्यासाठी बोलवत असे. त्यांच्याशी जवळीक साधायचा आणि संधी साधून विनयभंग किंवा शारिरीक अत्याचार करण्याचा प्रयत्न करायचा. आतापर्यंत त्याने १० ते १५ महिलांवर लैगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. काही काळ हॅकरचं काम करणारा हा भामटा एका वेळी एकचं सिमकार्ड वापरत असल्यामुळे मागील चार महिन्यांपासून पोलिसांच्या हाती लागत नव्हता.

दरवेळी तो वेगळा मोबाईल क्रमांक वापरत असे. तो दरवेळी सीम कार्ड बदलत होता. ओला किंवा उबर बूक करतानाही तो आपलं सीम कार्ड बदलत होता. आपल्या नावे नोंदणी असणारा क्रमांक तो वापरत नव्हता. त्याने हॅकर म्हणून काम केलं असून त्याला कॉम्प्युटरची चांगली माहिती आहे. त्यानं नोडल ऑफिसर म्हणून सिम कार्ड कंपनीत काम केलेलं आहे.

त्याने पुण्यातील एका महिलेशी संपर्क साधला. तिला नवी मुंबईत बोलावून घेतले, नवी मुंबईत दोघांनी जेवण केले.  त्याने सदर महिलेस लॉजवर राहू असे सांगितले. मात्र महिलेने नकार दिल्यावर टॅक्सीतून जाताना त्याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने नकार देत खाली उतरली. हा प्रकार पाम बीच एपीएमसी येथे घडला. त्यावेळी तिने तडक एपीएमसी पोलीस ठाणे गाठून त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला. याबाबत सलग चार महिने पोलीस तपास करत होते. अखेर तांत्रिक तपासात आरोपी हा मालाड येथे असल्याचे समजल्यावर सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. 



हेही वाचा - 

मुंबईच्या चौपाट्यांवर पोलिसांची आता ‘एटीव्ही’वरून गस्त

मुंबई उपनगरातील नागरिकांना दिलासा, गोरेगावमध्ये 'इथं' नवं ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र सुरू

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा