धक्कादायक ! अल्पवयीन मुलीस वेश्याव्यवसायात ढकलले, दाम्पत्यांना अटक

एका समाजसेवा करणारी एक महिला आणि तिच्या सहकाऱ्याच्या सतर्कतेमुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीस वेश्याव्यवसायात ढकलले, दाम्पत्यांना अटक
SHARES

मुंबईत अल्पवयीन मुलींची अनैतिक कामासाठी विक्री करणाऱ्या दांपत्यांचा समाजसेवा शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी  एका दांपत्याला अटक केली असून निलेश चंद्रकांत मडवी (२९), वर्षा निलेश मडवी (२५) अशी या दोघांची नावे आहेत. एका समाजसेवा करणारी एक महिला आणि तिच्या सहकाऱ्याच्या सतर्कतेमुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- महाराष्ट्राला कर्तृत्ववान मुख्यमंत्री हवाय, ड्रायव्हर नको- नारायण राणे

चोरी-दरोड्याप्रमाणे आता अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या वाढत्या घटना पालक आणि पोलिसांसाठी चिंतेची बाब ठरत आहेत. अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, फूस लावून पळवून नेण्याच्या दररोज किमान चार घटना मुंबईत घडत आहेत. विशेष म्हणजे या अपहरणांमध्ये परिचयातील किंवा परिसरातील तरुणांचा समावेश सर्वाअधिक आहे. अनेकदा मुलीच्या घरची परिस्थिती हालाकीची असल्याचे पाहून तिच्या घरातल्यांना मुलीला शहरात चांगली नोकरी देण्याचे आमीष दाखवून त्यांना फूस लावून आणतं, त्यांना वेश्या व्यवसायात ढकलले जाते. नुकतीच अशी एक घटना वांद्रे परिसरात उघडकीस आली आहे.  उल्हासनगर परिसरात राहणाऱ्या १३ वर्षीय मुलीला फूस लावून निलेश आणि वर्षा यांनी मुलीला मुंबईत आणले. मुंबईत आणल्यानंतर नंतर या दांपत्यांनी तिची वेश्या व्यवसायत विक्री करण्याचा कट रचला. मात्र या गैरकृत्याची कुणकुण त्याच परिसरात राहणाऱ्या एका समाजसेविकेला लागली.

हेही वाचाः- राज्यात कन्टेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन ३१ डिसेंबरपर्यंत कायम

त्या बळीत मुलीच्या सुटकेसाठी समाजसेविकेने मुंबई पोलिसांच्या समाज सेवा शाखेकडे मदत मागितली. पोलिसांनी एक डमी गिऱ्हाईक पाठवून मुलीचा सौदा ठरवला. मुलीच्या विक्रीचे अडवान्स पैसेही दोघांनी स्विकारले. ते पैसे त्यांनी घर खर्चासाठी वापरले. २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास हे दोन्ही दांपत्या मुलीला घेऊन मॅकडोनल्डस, खान हाऊस, पहिला माळा, हिल रोड, वांद्रे येथे येणार होते. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला.  निलेश आणि वर्षा मुलीला घेऊन त्या ठिकाणी आले असताना. पोलिसांनी या दांपत्यांना रंगेहाथ पकडत मुलीची सुटका केली. या प्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात ३६६(अ), ३७०(१), ३७२, ३४, भा.द.वि कलमांसह, कलम १६,१७,१८ पोस्को अँक्टसह ४,५ पिटा अँक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करत, पोलिसांनी दोघांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.  यातील आरोपी निलेश मडवी हा शहाड गावठान कोळीवाडा, कल्याण परिसरात राहतो. तर वर्षा ही मुलगी रहात असलेल्या उल्हासनगर शहाड फाटक,नामदेववाडी परिसरात राहते. या दोघांनी या पूर्वीही अशा प्रकारे अनेक मुलींना फूस लावून वेश्या व्यवसायात ढकलल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यान अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत.

संबंधित विषय