धक्कादायक ! कांदिवलीत बापाने मुलींना विष पाजून केली आत्महत्या

कर्जाला कंटाळून अलीयांनी मुलींना विष पाजून स्वत: आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

धक्कादायक ! कांदिवलीत बापाने मुलींना विष पाजून केली आत्महत्या
SHARES

कर्जाला कंटाळून कांदिवलीत ४५ वर्षीय व्यक्तीने आपल्या दोन्ही मुलींना विष पाजून स्वत: गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अजगर अली जब्बार अली (४५) असे मृत व्यक्तीचे नाव असून त्याच्यासोबत एका १२ वर्षाची आणि ८ वर्षाच्या मुलीचा मृतदेह घरात मिळाला आहे. याघटनेची माहीती मिळताच कांदिवली पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

हेही वाचाः- महाराष्ट्र घाबरला नाही.. घाबरणार नाही- उद्धव ठाकरे

हे कुटुंब कांदिवली पश्चिमेकडील खान गल्ली, लालजी पाडा, गरुडा पेट्रोल पंप समोर, गणेशनगर येथे राहत होते. या ठिकाणी अजगर अली जब्बार अली (४५) यांनी दोरीच्या सहाय्याने लोखंडी अँगलला गळफास लावून घेतला. मिळालेल्या माहितीनुसार ४५ वर्षीय व्यक्तीबरोबरच त्यांची १२ वर्षीय मुलगी कोनेंन आणि ८ वर्षीय सुजैन यांचा मृत्यू झाला आहे. माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आहे. तरी घटनास्थळी कांदिवली पोलीस ठाण्याचे अधिकारी हजर असून अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचाः- मुंबई महापालिका करणार भटक्या श्वानांचं लसीकरण

 घटनास्थळावर एक सुसाइड नोटही पोलिसांना मिळाली आहे. यामध्ये आत्महत्येचं कारण कर्ज असल्याचे सांगितले जात आहे. तरी अद्याप याबाबत अधिक तपास केला जात आहे. मृत व्यक्तीने कोणाकडून कर्ज घेतले होते, याबाबत कोणी त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत होते का? यानुसारही तपास केला जाणार असल्याचे सांगितले आहे.

संबंधित विषय