Advertisement

महाराष्ट्र घाबरला नाही.. घाबरणार नाही- उद्धव ठाकरे

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वर्षपूर्ती केली असून कितीही संकटे आली तरी महाराष्ट्र घाबरला नाही, घाबरणार नाही, असे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.

महाराष्ट्र घाबरला नाही.. घाबरणार नाही- उद्धव ठाकरे
SHARES

जनतेच्या विश्वासाच्या बळावर स्थापन झालेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वर्षपूर्ती केली असून कितीही संकटे आली तरी महाराष्ट्र घाबरला नाही, घाबरणार नाही, असे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. सोबतच जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही देखील दिली.

सह्याद्री अतिथीगृह इथं महाविकास आघाडी शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा झाला यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.  खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, खासदार, आमदार यावेळी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे (uddhav thackeray) म्हणाले, जनतेच्या आशीर्वादामुळे तीन पक्षांचं सरकार वर्षभरापूर्वी अस्तित्वात आलं. वर्षभरात नैसर्गिक संकटांना तोंड देत राज्यातील जनतेच्या पाठिशी ठामपणे हे सरकार उभं आहे. नैसर्गिक आपत्तीत बळीराजाला सावरतानाच कोरोनाच्या संकटात सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी भक्कमपणे काम केलं जात आहे. कोरोनाकाळात रुग्णसंख्या असो की मृत्यूसंख्या त्यात राज्य शासनाने लपवाछपवी केलेली नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

हेही वाचा- योगींच्या येण्याने उद्धव ठाकरेंची झोप उडालीय, कॅबिनेट मंत्र्यांचा पलटवार

हे सरकार म्हणजे जगन्नाथाचा रथ असून त्याला पुढे नेण्याची कामगिरी सर्वांच्या साथीने होत आहे. वर्षभरात संकटग्रस्ताला धीर देण्याचे काम या शासनाने केलं आहे. त्यामुळे संकटकाळात बळीराजा कधी रस्त्यावर आला नाही. नवीन उमेद आणि प्रदीर्घ अनुभव या समन्वयातून या शासनाची वाटचाल सुरू असल्याचे सांगतानाच लोकांचा सहभाग यात दिसून आल्याचं यावेळी शरद पवार (sharad pawar) यांनी सांगितलं.

जनतेच्या विकासासाठी हे सरकार बांधील आहे. या शासनाची वर्षपूर्ती ही समर्थ महाराष्ट्राला घडविणाऱ्या निर्धाराचीआहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जनता आणि प्रशासन यांच्यात संघभावना निर्माण करण्याचं काम केलं आहे. कोरोना योद्धयांचे आभार मानत कोरोना काळात विकासकामांना खीळ बसणार नाही याची ग्वाहीही उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी दिली. 

तर, महाविकास आघाडीचं सरकार किमान समान कार्यक्रमावर काम करीत असून अतिवृष्टी, चक्रीवादळ कोरोना याकाळात नागरिकांना विविध उपाययोजनांनी दिलासा देण्याचं काम केलं आहे. गेल्यावर्षी शिवतीर्थावर झालेला शपथविधी सोहळा ऐतिहासिक क्षण असल्याचा उल्लेख महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनी केला.  

(maharashtra cm uddhav thackeray praised maha vikas aghadi government for completing one year)


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा