अबब 1 कोटी 85 लाखांचं सोनं जप्त

 Mumbai
अबब 1 कोटी 85 लाखांचं सोनं जप्त
अबब 1 कोटी 85 लाखांचं सोनं जप्त
अबब 1 कोटी 85 लाखांचं सोनं जप्त
See all

मुंबई - मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर सहा प्रवाशांकडून तब्बल 1 कोटी 85 लाखांचे सोने जप्त करण्यात आले. हे सहाजण चिनी असून, त्यांच्याकडून सहा किलो वजनाच्या कच्च्या सोन्याचे दागिणे जप्त करण्यात आले आहेत. 

यामध्ये भगवान बुद्ध असलेल्या पेडेंटची चेन, सोन्याची बक्कल्स, तिबेटीयन देवांची चित्रे असलेल्या सोन्याच्या प्लेटस् यांचा समावेश आहे.

हे सगळे चिनी नागरिक बुधवारी मुंबईला आले असता त्यांच्याकडून हे सोनं जप्त करण्यात आलं. यातील तिघे हाँगकाँगवरून तर इतर तिघे बेजिंगवरून मुंबईला आले होते. विशेष म्हणजे या सगळ्यांनी कोणताही कर न भरता या सोन्याची तस्करी केल्याची कबुली त्यांनी कस्टम विभागाला दिली आहे. त्यांना कस्टम कायदा 1962 च्या कलम 108 अंतर्गत अटक करण्यात आली.

Loading Comments