डम्पिंग ग्राऊंडमध्ये शिरलेल्या सहा महिलांना अटक

 Pali Hill
डम्पिंग ग्राऊंडमध्ये शिरलेल्या सहा महिलांना अटक

मुंबई - वर्षभरापूर्वी देवनार डम्पिंग ग्राऊंडला सातत्याने आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे मुंबईसह नवी मुंबईकरांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला होता. याबाबत पालिकेने गुन्हा दाखल केल्यानंतर शिवाजीनगर पोलीसांनी या आगीची चौकशी सुरू केली. दरम्यान येथील काही कचरा वेचक आणि भंगारमाफियाच ही आग लावत असल्याचं समोर आलं. पोलिसांनी 25 ते 30 जणांना अटकही केली. त्यानंतर डम्पिंग ग्राउंडवर प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तरीही बुधवारी पहाटे सहा महिला भंगार शोधण्यासाठी डम्पिंग ग्राऊंडमध्ये शिरल्या होत्या. शिवाजीनगर पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ या महिलांना ताब्यात घेतलं. या महिला डम्पिंग ग्राऊंड शेजारील झोपडपट्ट्यांमधील रहिवासी असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली.

Loading Comments