मॅरेथॉनची 2200 पदके चोरणाऱ्या 6 जणांना अटक

मुंबईत रविवारी झालेल्या टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेसाठी बनवलेली 2200 पदके चोरीला गेली होती.

मॅरेथॉनची 2200 पदके चोरणाऱ्या 6 जणांना अटक
SHARES

मुंबईत रविवारी झालेल्या टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेसाठी बनवलेली 2200 पदके चोरणाऱ्या सहा जणांना आझाद मैदान पोलिसांनी अटक केली. बॉम्बे जिमखान्याच्या ग्राऊंडमध्ये तयार केलेल्या तंबूत ही पदके ठेवली होती.

रविवारी ही पदके चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांत नोंदवण्यात आलेली. आझाद मैदान पोलिसांनी सांगितले की, या मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना ही पदके दिली जाणार होती. मात्र, पदके चोरीला गेल्याचे कळताच संयोजकांनी तात्काळ पोलिसांत तक्रार केली.

पोलिसांनी विघ्नेश पांडे-तेवार, नासिर अब्दुल शेख, पिरामल बालन गौंडर, गौतम साळुंखे, रोहित विजय सिंह, आमीर रफीक शेख यांना अटक केली. पहाटे 3 ते 11 वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली. ही पदके 162 बॉक्समध्ये ठेवली होती. त्यातील 22 बॉक्सची चोरी झाली. त्यात 2200 पदके होती. अटक केलेल्या व्यक्ती बहुतांशी कामगार आहेत. चोरी केलेल्या पदकांची किंमत 1.38 लाख रुपये आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे.



हेही वाचा

अल्पवयीन मुलीचा व्हिडिओ शूट करून ब्लॅकमेल करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

सार्वजनिक ठिकाणी नाचणाऱ्या इंस्टाग्राम इन्फ्लुअंसरला पोलिसांची तंबी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा