अल्पवयीन मुलीचा व्हिडिओ शूट करून ब्लॅकमेल करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलांना डोंगरी बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

अल्पवयीन मुलीचा व्हिडिओ शूट करून ब्लॅकमेल करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
SHARES

12 वर्षीय मुलीचे अश्‍लील चित्रीकरण करून तिच्याकडून खंडणी मागितल्याची घटना डोंगरी परिसरात घडली आहे. याप्रकरणी 4 मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलांना डोंगरी बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

12 वर्षीय पीडितेला एप्रिल 2023 मध्ये दोन मुलांनी व्हिडिओ कॉल केला होता. त्यावेळी आरोपीने पीडित मुलीला धमकावले आणि तिचे कपडे काढण्यास सांगितले आणि तिचे चित्रीकरण केले. तसेच तिच्याकडे वेळोवेळी अश्लील छायाचित्रांची मागणी केली. हे छायाचित्र आणि चित्रीकरण सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिली.

त्यानंतर आरोपीने पीडित मुलीकडे पैशांची मागणी सुरू केली. आरोपींनी तरुणीकडे 20 हजार रुपयांची खंडणी मागितली. मुलीने या मुलांना आठ हजार रुपये दिले. मात्र तिने जास्त पैसे देण्यास नकार दिला. आरोपी तिला धमक्या देत होते. अखेर पीडित मुलीने हा प्रकार तिच्या आईला सांगितल्यानंतर तिने डोंगरी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी 4 अल्पवयीन मुलांविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण आणि लैंगिक गुन्ह्यांपासून (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.हेही वाचा

ठाण्यातील ज्यूंचे प्रार्थनास्थळ बॉम्बने उडवण्याची धमकी

सार्वजनिक ठिकाणी नाचणाऱ्या इंस्टाग्राम इन्फ्लुअंसरला पोलिसांची तंबी

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा