पायधुनीत 11 लाखांच्या बनावट सिगारेट्स

 Pali Hill
पायधुनीत 11 लाखांच्या बनावट सिगारेट्स
पायधुनीत 11 लाखांच्या बनावट सिगारेट्स
See all

पायधुनी - पोलिसांच्या समाजसेवा शाखेने पायधुनी परिसरात छापा टाकून ब्रँडेड विदेशी कंपनीच्या 11 लाख किंमतीच्या बनावट सिगारेट्स बुधवारी रात्री जप्त केल्या. या प्रकरणी दोघांना कॉपी राइट्सच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली.

इम्तियाज मूर्तझा खान (49) आणि नादिर नूरमोहम्मद शेख (42) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं अाहेत. या वेळी पोलिसांच्या समाजसेवा शाखेने रुली रिवर कंपनीचे 200 बॉक्स, विन कंपनीचे 275, परीस कंपनीचे 25 बॉक्स अशा अंदाजे 11 लाख 37 हजार 500 रुपये किमतीच्या बनावट सिगारेट्स जप्त केल्या.

इम्तियाज हा पायधुनीतला तर नादिर हा मानखुर्द येथील रहिवासी आहे. दोघांनाही अटक करण्यात आली असल्याची माहिती पायधुनी पोलिसांनी दिली आणि त्याचा अधिक तपास करत असल्याचं पायधुनी पोलिसांनी सागितलं.

Loading Comments