साप चावल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू

 Aarey Colony
साप चावल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू
Aarey Colony, Mumbai  -  

साप चावल्यानंतर वेळीच उपचार न मिळाल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगावमधल्या आरे कॉलनीत घडली आहे. यशोदा कडू असे या मृत महिलेचे नाव असून ती 19 वर्षांची आहे.

ही महिला गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीच्या युनिट क्रमांक 29 मध्ये राहत होती. मंगळवारी दुपारी बाळाला दूध पाजत असताना सापाने तिच्या पाठीला तीन वेळा दंश केला. त्यावेळी तिला काहीच समजले नाही. पण काही वेळाने तिला पाठीत वेदना जाणवू लागल्याने ती शेजाऱ्यांकडे गेली आणि त्यांच्याकडे याबाबत सांगितले. त्यावेळी साप चावल्याचे शेजाऱ्यांना कळाल्यानंतर त्यांनी महिलेला डॉक्टरांकडे घेऊन जाण्यासाठी धावपळ सुरू केली.


जवळच रुग्णालय, पण सुविधांचा आभाव

त्याच परिसरात आरे रुग्णालय आहे. पण तिथे योग्य सुविधाच उपलब्ध नसल्याने महिला आणि बाळाला जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचाराला विलंब झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments