लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी आतापर्यंत ४१ हजार जणांना अटक

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३४७ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर ९६,६०५ वाहने जप्त करण्यात आली.

लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी आतापर्यंत ४१ हजार जणांना अटक
SHARES

राज्यात कोरोना संक्रमणाला सुरूवात होताच खबरदारी म्हणून सरकारकडून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. मात्र काही बेशिस्त नागरिक नियमाचं उल्लंघन करत होते. अशांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरूवात केली. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ८८  हजार गुन्हे दाखल केले.  या कारवाई दरम्यान पोलिसांनी तब्बल ४१ हजार जणांना अटक करत कारवाई केली.  

हेही वाचाः- राज्यातून परतीच्या पावसाला आजपासून सुरुवात

लॉकडाऊनला सुरूवात झाल्यापासून नागरिकांना पोलिसांकडून विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात होते. हे आवाहन नागरिकांच्या सुरक्षेसाठीच होते. मात्र तरीही काही जण विनाकारण बाहेर फिरत लॉकडाऊनचे उल्लंघन करत होते. मुंबईसह राज्यात  कोरोना संक्रमाणाचा आलेख वाढत घेल्यानंतर पोलिसांनी कडक पाऊले उलण्यास सुरूवात केली. त्यानुसार राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ८८  हजार गुन्हे दाखल केले. तसेच १३४७ वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल झाले तर ३४ कोटी ६१ लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आली. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. एकंदरीत या कारवी दरम्यान पोलिसांनी ४१,८२६ व्यक्तींना अटक करण्यात आली. तर ९६,७०५ वाहने जप्त केली. यातील विविध गुन्ह्यात पोलिसांनी अनेकांवर केलेल्या दंडात्मक कारवाईतून राज्याच्या तिजोरीत ३४ कोटी ६१ लाख ८४ हजार ८५८ रुपयांचा दंड जमा करण्यात आला.

हेही वाचाः- “स्वतःला वाघ म्हणवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी कुणाला कधी कानाखाली तरी दिली आहे का?”

     पोलिसांनी केलेल्या कारवाई दरम्यान त्याच्यावर हल्ला केल्याच्या ३७९ घटनाही घडल्या, त्यात ९०३ व्यक्तींना, ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे. तसेच पोलीस विभागाचा १०० नंबर  हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर  १,१४,१५९ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३४७ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर ९६,६०५ वाहने जप्त करण्यात आली. नागरिकांच्या सेवेसाठी सदव सत्पर राहणाऱ्या पोलिस हे जनतेच्या वारंवार संपर्कात येत असल्यामुळे पोलिस दलातील २६,२४७ पोलीस व अधिकारी कोरोना ग्रस्त झाले होते. त्यापैकी २४,३२९ पोलिस कर्मचाऱ्यांनी यशस्वी रित्या कोरोनावर विजय मिळवला. मात्र दुर्देवाने  २५३ पोलीस व २७ अधिकारी अशा एकूण २८० पोलिस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला.

Read this story in हिंदी
संबंधित विषय