धावती लोकल पकडताना प्रवाशाचा मृत्यू


धावती लोकल पकडताना प्रवाशाचा मृत्यू
SHARES

मुंबईत लोकल अपघाताचे प्रमाण वाढलं आहे. यावर नियंत्रण आणण्यासठी 'धावती लोकल पकडू नये', अशा सूचना वारंवार रेल्वे प्रशासनाकडून दिल्या जातात. मात्र, तरीही प्रवासी याकडे सतत दुर्लक्ष करताना दिसत आहेत. परिणामी प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतो आहे. अशीच घटना रविवारी पहाटेच्या सुमारस दादर स्थानकात घडली आहे.
धावती लोकल पकडत असताना सुदर्शन चौधरी (३१) या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. अवघ्या दोन महिन्यानंतर सुदर्शनचं लग्न होणार होतं. मात्र, या अपघातामुळं त्याच्या कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.


'ट्रेकिंगला जातो म्हणून निघाला...

सुदर्शन चौधरी हा मूळचा नागपूरचा असून मुंबईत मालाड येथे राहत होता. मुंबईतील आयबीएम कंपनीत तो कामाला होता. सुदर्शनला ट्रेकिंगची आवड होती. यासाठी रविवरी पहाटे 'ट्रेकिंगला जातोय' असं म्हणून निघालेला सुदर्शन घरी परतलाचं नाही. त्यावेळी सुदर्शन ट्रेकिंगला आला नाही म्हणून त्याच्या मित्रांनी आणि कुटुंबीयांनी चौकशी केली असता सुदर्शनचा मोबाईल दादर रेल्वे पोलिसांकडे असल्याची माहिती समोर आली.


सीसीटीव्ही फुटेज तपासले असता...

सुदर्शनच्या मित्रांनी दादर रेल्वे पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार नोंदवली. त्यावेळी पोलिसांनी स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यांना सकाळी पहाटेच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर ठाण्याच्या दिशेनं जाणारी धावती लोकल पकडतं असताना तोल जाऊन त्याचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.

सुदर्शन हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचं लग्न दोन महिन्यांवर येऊन ठपलं होतं. लग्न असल्यामुळं घरी जोरदार तयारीही सुरू होती. मात्र, सुदर्शनच्या मृत्यूची वार्ता आल्याने त्याच्या कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा