थर्टी फर्स्टला उगाच 'लफडा' नको, शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त

जुन्या वर्षाला दणक्यात निरोप देणाऱ्यांनी नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचं फूल्ल टू प्लानिंगही केलं. ऑफिस सुटल्यानंतर कुठे जायचं? कुठे बसायचं? तू काय घेणार? या सारखे मॅसेज व्हॉट्सअ‍ॅपवर सुरू झाले. मात्र थर्टी फर्स्टला मौज मज्जा करताना कायदा व सुव्यवस्थेचं भानही ठेवा. कारण थर्टी फर्स्ट निमित्ताने मुंबई पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला आहे.

थर्टी फर्स्टला उगाच 'लफडा' नको, शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त
SHARES

बघता बघता वर्ष संपलं... थर्टी फर्स्ट येऊन ठेपला... जुन्या वर्षाला दणक्यात निरोप देणाऱ्यांनी नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचं फूल्ल टू प्लानिंगही केलं. ऑफिस सुटल्यानंतर कुठे जायचं? कुठे बसायचं? तू काय घेणार? या सारखे मॅसेज व्हॉट्सअ‍ॅपवर सुरू झाले. मात्र थर्टी फर्स्टला मौज मज्जा करताना कायदा व सुव्यवस्थेचं भानही ठेवा. कारण थर्टी फर्स्ट निमित्ताने मुंबई पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला आहे.


चौपाट्यांवर विशेष बंदोबस्त

नववर्षाच्या स्वागतासाठी अवघी मुंबापुरी सज्ज झाली आहे. शहरातील गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह, नरिमन पॉईंट, वरळी, गिरगाव, दादर व जुहू चौपाटी म्हणजे मुंबईकरांच्या सेलिब्रेशनचं हक्काचं ठिकाणं. या ठिकाणी थर्टी फर्स्टला मुंबईकरांसोबतच परदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने भेट देत असल्याने इथं विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.


रात्री १२ वाजता 'नो लाईट बंद'

अंधाराचा गैरफायदा घेऊन अश्लील कृत्य होऊ नये म्हणून शहरातील हॉटेल्स, पब्ज, डिस्को आणि ग्राऊंडवर आयोजित पार्टीत रात्री १२ वाजता लाईट बंद करू नये, असे स्पष्ट आदेश मुंबई पोलिसांनी दिले आहेत.



परवाना नाही, तर दारू नाही

बारमध्ये दारू पिण्याचा परवाना असेल, तरच दारू मिळेल, बारबाहेर लावलेल्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यास संबंधित बारमालकांवर कारवाई करण्यात येईल. सोबतच शहरालगतच्या समुद्रात कुठल्याही बोट पार्टीला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही, असंही मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.


फौजफाटा किती?

शहराच्या सुरक्षेसाठी ३४ हजार पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाच्या १३ प्लाटून, ५ शीघ्र कृती दलाच्या तुकड्या, बॉम्बशोधक व नाशक पथकं, १ हजार होमगार्ड तैनात असतील. पोलिसांची मदत हवी असल्यास १००, १०३ या नियंत्रण कक्षाला फोन करावा. किंवा ट्विटरद्वारे पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.



मद्यपींवर सीसीटीव्हीची नजर

मद्यप्राशन करून बेधुंद होणाऱ्या, ड्रिंक अॅण्ड ड्राईव्ह करणाऱ्या मद्यपींवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. त्यानुसार ३१ डिसेंबर रोजी सकाळपासून ते १ जानेवारी पहाटे ६ वाजेपर्यंत वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू राहणार आहे. वाहतूक पोलिसांनी मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी चौक आणि महत्त्वांच्या मार्गांवर नाकाबंकीची जागा निश्चित केली आहे. शहराच्या मुख्य चौकांमध्ये, नाक्यांवर ही तपासणी केली जाईल. तर शहरातील अतिसंवेदनशील परिसरात पोलिसांचा विशेष बंदोबस्त असेल. दारू पिऊन धांगडधिंगा करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.



हेही वाचा-

थर्टी फर्स्टच्या नशेवर पोलिसांचा वाॅच, ३ अंमली पदार्थ तस्कर जेरबंद

एटीएम लुटणाऱ्या रोमानियन चोरांना दिल्लीत अटक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा