दूध भेसळी विरोधात राज्यभरात सर्वेक्षण

पॅकेज्ड दुधाचे 680 नमुने आणि उघड्या दुधाचे 382 नमुने तपासण्यात आले.

दूध भेसळी विरोधात राज्यभरात सर्वेक्षण
SHARES

अन्न आणि औषध प्रशासनाने दुधात (milk) होणारी भेसळ (adulteration) रोखण्यासाठी 15 जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात सर्वेक्षण मोहीम राबवली. त्याअंतर्गत विविध ठिकाणांहून दुधाचे 1062 नमुने तपासणीसाठी (testing) घेण्यात आले.

त्यात विविध नामांकित कंपन्यांच्या पिशवीबंद दुधाच्या 680 आणि सुट्या दुधाच्या 382 नमुन्यांचा समावेश आहे.

राज्यात (maharashtra) दूध भेसळखोरांना जरब बसण्यासाठी आणि राज्यातील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आले आहेत.

अन्न आणि औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री योगेश कदम आणि आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली 15 जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात व्यापक दूध सर्वेक्षण मोहीम राबवण्यात आली.

या मोहिमेअंतर्गत एकाच वेळी राज्यभरातील विविध ठिकाणांहून दुधाचे नमुने घेऊन त्यांच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची सूचना 103 अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना करण्यात आली होती.

त्यानुसार 15 जानेवारीपासून राज्यभरातील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी दूध उत्पादक, वितरक, विक्रेते व रस्त्यावरील विक्री केंद्रांमधून दुधाचे एकूण 1062 नमुने विश्लेषणासाठी घेतले.

दुधाचे नमुने भेसळ, रसायनांचे प्रमाण आणि गुणवत्ता तपासण्यासाठी अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकृत अन्न प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.

या नमुन्यांच्या विश्लेषणानंतर दुधात भेसळ असल्याचे आढळल्यास संबंधित उत्पादक आणि पुरवठादारांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाने अधिकाऱ्यांना दिले आहेत.



हेही वाचा

कोल्डप्ले कार्यक्रमात लहान मुलांना प्रवेशबंदी

लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा