मद्याच्या अवैध वाहतुकीवर राज्य सरकारची करडी नजर


मद्याच्या अवैध वाहतुकीवर राज्य सरकारची करडी नजर
SHARES

मुंबई - मद्याच्या अवैध वाहतुकीवर राज्य सरकारची आता करडी नजर असणार आहे. राज्यातील उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलामध्ये वाढ होण्याकरिता तसेच देशी-विदेशी मद्याच्या अवैधपणे होत असलेल्या तस्करीला आळा घालण्यासाठी मुंबईसह राज्यात मद्य वाहतूक करणाऱ्या वाहनांना लवकरच जीपीएस बसवून ट्रॅक अँड ट्रेस योजना सुरु करण्यात येणार आहे. यामुळे मद्य वाहतूक करणाऱ्या वाहनांची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कंट्रोल रूममध्ये उपलब्ध होणार आहे. महसूल वाढविण्यासाठी यासंदर्भात पावले उचलली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ्ज समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती ट्रॅक अँड ट्रेस लवकरच लागू करण्याबाबत काम करत आहे. या अगोदरही मद्य तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ८४२२००११३३ हा व्हॉट्सअॅप क्रमांक सुरु केला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा