सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण: रिया चक्रवर्तीच्या व्हाॅट्स अॅप मेसेजमधून धक्कादायक खुलासा

शौविकचा मित्र त्याला ड्रग्जसाठी मदत मागतोय. सायंकाळी पाच वाजून २९ मिनीटांपासून सायंकाळी सहा वाजून ४७ मिनीटे ही चॅटींग चालली होती.

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण: रिया चक्रवर्तीच्या व्हाॅट्स अॅप मेसेजमधून धक्कादायक खुलासा
SHARES

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सीबीआय चौकशीत रिया आणि तिचा भाऊ शौविक यांच्यातील व्हाॅट्स अॅप मेसेजने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तसेच शौविक हा अंमली पदार्थांच्या संपर्कात असल्याची माहिती या मेसेजमधून पुढे आली आहे. तर सुशांतला अंमली पदार्थ पुरवणाऱ्यांमध्येही त्याचा सहभाग असल्याचे बोलले जाते. त्यामुळे रियाचा भाऊ शौविकच्या  अडचणीत वाढ झाली आहे.

हेही वाचाः- सरकारला  मंदिर उघडण्याबाबत इतका आकस का?- राज ठाकरे

एनसीबी तपास करत असलेल्या शौविकचे व्हॉट्सअॅप चॅट ‘मुंबई लाइव्ह न्यूज’च्या हाती लागले आहेत. त्यात शोविक मित्रासोबत ड्रग्स बद्दल बोलत आहे. शौविकचे हे चॅट १० ऑक्टोबर २०१९ चे आहेत.  शौविकचा मित्र त्याला ड्रग्जसाठी मदत मागतोय. सायंकाळी पाच वाजून २९ मिनीटांपासून सायंकाळी सहा वाजून ४७ मिनीटे ही चॅटींग चालली होती. त्याच चॅटमध्ये हॅश, वीड व बड यांचा उल्लेखही करण्यात आला आहे. त्यात बडची किंमत दोन ते अडीच हजार रुपये असल्याचा उल्लेखही आहे.  तसेच शौविक त्याला काही ड्रग डिलरचे क्रमांक देत असल्याचे या चॅटमधून निष्पन्न  झाले आहे. शेवटी मदत मागणारा मित्र अंधेरी माल घेण्यासाठी जात असल्याचेही म्हणत आहे.

हेही वाचाः- मास्क न घालणाऱ्यांकडून पालिकेनं केला 'इतका' दंड वसूल

त्यातील दोन डीलरला एनसीबीने अटक केली आहे. सुशांतला घेत असलेले ड्रग्स याच डीलरकडून मिळाले होते का, याबाबत एनसीबी तपास करत आहे. त्याबद्दल सखोत तपास सध्या एनसीबी करत आहे. हे ड्रग्सचे जाळे खार परिसरातील आहे. त्या परिसरातून अनेक डीलरची धरपकड सध्या एनसीबी करत आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा