Advertisement

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण: ‘त्या’ नेत्यांचीही चौकशी करा, भाजपची मागणी

मुंबई पोलिसांवर दबाव टाकून तपासाची दिशा भरकटवणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांचीही सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण: ‘त्या’ नेत्यांचीही चौकशी करा, भाजपची मागणी
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयीत रिया चक्रवर्ती हिच्यासोबतच मुंबई पोलिसांवर दबाव टाकून तपासाची दिशा भरकटवणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांचीही सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून केली आहे. (bjp mla atul bhatkhalkar demands cbi inquiry of maha vikas aghadi government leaders in sushant singh rajput suicide case)

बॉलिवूड, ड्रग्ज आणि पॉलिटिक्स यांच्यातील विषारी संबंध बाहेर येऊ नये म्हणून जोरदार प्रयत्न करणाऱ्या राज्य सरकारमधील नेत्यांचाही सीबीआयने भांडाफोड करावा. तेव्हाच सुशांत सिंह प्रकरणातील सत्य बाहेर येईल, असंही अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

आपल्या पत्रात अतुल भातखळकर यांनी लिहिलं आहे की, सीबीआयच्या तपासात सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बॉलिवूड, ड्रग्ज आणि पॉलिटिक्स यांच्यातील संबंध उघड झाले आहेत. परंतु हे प्रकरण सीबीआयकडे जाण्याच्या २ महिने आधी या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होते. त्यावेळेला या प्रकरणाच्या तपासाची दिशा भरकटवण्याचा पूर्ण प्रयत्न झाल्याचंही समोर आलं आहे. सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केल्यानंतर पुढील ३ तासांच्या आत राज्याच्या गृहमंत्र्यांनी ही आत्महत्या असल्याचं वक्तव्य केलं. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी केलेली वक्तव्ये आणि ट्विट यातून ते ही आत्महत्या असून या प्रकरणात कुठेही गडबड झालेली नाही, असंच दाखवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कुठल्या दिशेने तपास केला पाहिजे, याचेच दिशा-निर्देश ते जणू याद्वारे देत होते, असं अतुल भातखळकर यांचं म्हणणं आहे.

हेही वाचा - संदीप सिंहसोबत भाजपचं कनेक्शन काय? काँग्रेसचा प्रश्न

मुंबई पोलिसांनी राजकीय दबावात येऊन याप्रकरणी २ महिन्यात एकही एफआयआर नोंदवला नाही. Inquest inquiry च्या नावाखाली मुंबई पोलीस केवळ तपासाचं नाटक करत राहिली. एवढंच नाही तर Inquest inquiry शी संबंध असलेल्या-नसलेल्या सुमारे ५० हून अधिक बाॅलिवूडमधील व्यक्तींना बोलवून त्यांचा जबाब घेण्याचं काम मुंबई पोलिसांनी केलं. जेव्हा बाॅलिवूडमधील व्यक्तींना जबाब नोंदवण्यासाठी बोलवलं जायचं तेव्हा या व्यक्तीचा जबाब नोंदवू नका किंवा त्या व्यक्तीचा जबाब अशा पद्धतीने नोंदवा हे सांगण्यासाठी सत्ताधारी पक्षातील मोठा नेता, मंत्री पोलिसांना फोन करायचा, अशीही माहिती आहे. ही माहिती आम्ही सीबीआयला द्यायलाही तयार आहोत.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमागील सत्य आणि बॉलिवूड, ड्रग्ज आणि पॉलिटिक्स यांच्यातील विषारी संबंध उघड होऊ नयेत, यासाठी राज्यातील गृह विभाग आणि सत्ताधारी महाविकास आघाडीतील मोठा नेता प्रयत्नशील होते, त्यासाठी ते पोलिसांवर दबाव टाकत होते. अशा सगळ्या नेत्यांची भूमिका आणि त्यांचे प्रयत्न या सगळ्यांची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली आहे.  

हेही वाचा - मुंबई पोलिसांना काम करू न देणारा सरकारमधील व्यक्ती कोण?- आशिष शेलार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा