अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक, सुशांत प्रकरणाशी संबध

उच्चभ्रूवस्तीत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या पोलिसांनी मुस्क्या आवळण्यास सुरूवात केली. नुकतीच केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी) गुन्हा दाखल स्थानिक तस्करांना पकडण्यास सुरूवात केली

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक, सुशांत प्रकरणाशी संबध
SHARES

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात त्याला अंमली पदार्थ करण्याचे व्यसन असल्याचे आरोप होऊ लागल्यानंतर त्या अनुसंगाने तपास सुरू केला. दरम्यान उच्चभ्रूवस्तीत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या पोलिसांनी मुस्क्या आवळण्यास सुरूवात केली. नुकतीच केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी) गुन्हा दाखल स्थानिक तस्करांना पकडण्यास सुरूवात केली आहे. अशाच माहितीवरून एनसीबीने नुकतीच अब्बास रेहमान अली लखानी(२१) व कर्ण अरोरा या दोघांना एनसीबीच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले.

हेही वाचाः- मुंबईत येत्या काही तासांत मुसळधार पावसाचा इशारा

अब्बास हा वांद्रे येथील पालीनाका व अरोरा हा पवई येथील चांदिवलीतील रहिवासी आहे. सुशांत सिंग प्रकरणात ड्रग्स तस्करांची माहिती मिळवण्यासाठी एनसीबीने मुंबईत धरपकड सुरू केली आहे.एनसीबीला मिळालेल्या माहितीवरून गांजा तस्कर साखळीची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यावरून लखानीला ४६ ग्रँम गांजासह कुर्ला गाव येथील सोनापूर लेनमधून अटक करण्यात आली. चौकशीत त्याला हा गांजा कर्ण अरोराने विकल्याचे त्याने सांगितले. अखेर एनसीबीने कर्ण याच्या ठिकाणावर छापा टाकला. त्याच्याकडे१३ ग्रॅम गांजा सापडला आहे.

हेही वाचाः- Unlock 4.0: ७ सप्टेंबरपासून मुंबई मेट्रो सुरू होणार, शाळा मात्र बंदच!

अखेर याप्रकरणी गुन्हा दाखळ करून दोघांनाही एनसीबीने अटक केली. दोघांकडून मिळून ५९ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. त्यांचा जबाब नोंदवण्यात आला असून त्यात ड्रग्स साखळीची माहिती घेण्यात आली आहे. त्यांच्याकडे सापडलेल्या गांजाचे नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. जप्त करण्यात आलेला सुकवलेला गांजा हा बड म्हणून प्रसिद्ध आहे. पार्ट्यांमध्ये मोठ्याप्रमाणात या बडचे सेवन केले जाते. अटक तरुणांकडून स्थानिक ड्रग्स विक्रेत्यांबाबत माहिती घेण्यात आली

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा