सुशांत आत्महत्या प्रकरण : अस्वस्थ वाटू लागल्याने ‘हा’ तपास अधिकारी सुट्टीवर

काही दिवसांपासून अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी शुक्रवारी रुग्णनिवेदन देत सुट्टीवर गेल्याचे कळते

सुशांत आत्महत्या प्रकरण : अस्वस्थ वाटू लागल्याने ‘हा’ तपास अधिकारी सुट्टीवर
SHARES

अभिनेता सुशांत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अनेकांनी संशय व्यक्त केले. सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास वांद्रे पोलिस हे करत असताना. यात परिमंडळ ९ चे पोलिस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी महत्वाची भूमिका होती. या कोरोना संक्रमणात काळात अनेक जण त्यांच्या संपर्कात होते. त्यामुळे काही दिवसांपासून अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी शुक्रवारी रुग्णनिवेदन देत सुट्टीवर गेल्याचे कळते.

 हेही वाचाः- 'ब्लॅक पँथर' चित्रपटातील अभिनेता चाडविक बॉसमन याचं निधन

सुशांत सिंह राजपूतने आत्महत्याकरून दोन महिने उटले. मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहेत. या प्रकरणाचा तपास हा वांद्रे पोलिस करत असताना. या प्रकरणाता संपूर्ण तपास हा अभिषेक त्रिमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. मात्र सुशांतचे वडिल के.के. सिंह यांनी बिहारमध्ये रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाला कलाटणी मिळाली. बिहार पोलिस तपासासाठी मुंबईत आल्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांवर तपासात सहकार्य न करत असल्याचे आरोप केले. तसेच वांद्रे पोलिस मुख्य आरोपी सोडून नको त्या व्यक्तींची चौकशी करत असल्याचे आरोप के.के. सिंह यांनी केले होते. या सर्व टिकांचा परिणाम सोशल मिडियावरही उमटले.

हेही वाचाः- मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, ऑरेंज अलर्ट जाहीर

बिहार सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी पत्र लिहून मागणी केली.  मुंबई पोलिसांनी या प्रकरणात ५३ हून अधिक जणांचे जबाब नोंदवले होते. मात्र अखेर सर्वोच्च न्यायालयाने रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. मात्र मुख्यता अभिषेक त्रिमुखेच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास अत्यंत हुशारीने आणि सावधगिरीने सुरू होता. दरम्यान शुक्रवारी त्रिमुखे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी आयुक्तालयात रुग्णनिवेदन पाठवत सुट्टी घेतल्याचे कळते.   

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा