सुशांत आत्महत्या प्रकरण : एका बड्या निर्मात्याला एनसीबीने बजावला चौकशीसाठी समन्स

नुकतीच अभिनेता अर्जुन रामपालची प्रेयसी गॅब्रिल्लाच्या भावाला ड्रग्ससह एनसीबीने अटक केली होती.

सुशांत आत्महत्या प्रकरण : एका बड्या निर्मात्याला एनसीबीने बजावला चौकशीसाठी समन्स
SHARES

सुशांत सिंग राजपुत आत्महत्या प्रकरणात सीबीआयने अखेर या प्रकरणात कोणताही घातपात झाला नसल्याचे जाहिर केले. मात्र सुशांतने नेमकी आत्महत्या कोणत्या कारणांमुळे केली हे अद्याप गुलदस्त्यात आहेत. त्यामुळे या प्रकरणात अनेक महत्वाची माहिती ही समोर येत असताना. या प्रकरणात  केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी)   बॉलीवूडमधील चित्रपट निर्मितीशी संबंधित एका व्यक्तीला समाज पाठवले आहे. याप्रकरणी नुकतीच अभिनेता अर्जुन रामपालची प्रेयसी गॅब्रिल्लाच्या भावाला ड्रग्ससह एनसीबीने अटक केली होती.

हेही वाचाः- महिलांना लोकल प्रवास: रेल्वेला राज्य सरकारच्या उत्तराची प्रतिक्षा

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी पेजथ्री, बॉलीवूड सेलेब्रीटींना ड्रग्स पुरवणा-या रॅकेटचा माग घेणा-या एनसीबीने  याप्रकरणी बॉलिवूडमधील एका व्यक्तीला समन्स पाठवले आहे.  निर्मितीशी संबंधित व्यक्ती असून लवकरच त्याची चौकशी करण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. यापूर्वी मुंबई, गोवा येथे एनसीबीने शोध मोहिम राबवली होती. याप्रकरणी करमजीत सिंग, ड्वेन फर्नाडीस, संकेत पटेल, अंकुश अनरेजा, संदीप गुप्ता व आफताब फतेह अन्सारी या सहा जणांना एनसीबीने अटक केली होती.त्यातील अंकुश अनरेजा हा हॉटेल व्यावसायिक असून पवईतील एका बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे. याशिवाय करमजीत आनंद उर्फ केजे दोघेही मोठे ड्रग्स वितरक आहेत.  केजे याने अंधेरीतील क्लबमध्ेय सुशांतला वीड(गांजा) पुरवला होता. तसेच रिया चक्रवरीच्या सांताक्रुझ येथील घरी व सुशांतच्या वांद्रे येथील घरीही केजेने ड्रग्स पोहोचवले असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. 

हेही वाचाः- केंद्रातलं सरकार परदेशी नाही, मदत मागण्यात गैर काय?- उद्धव ठाकरे

एनसीबीने  पेज थ्री सेलिब्रीटींशी संबंधीत अनुज केशवानी या बड्या वितरकाला अटक केल्यानंतर  ड्रग्स पुरवणा-या रॅकेटशी संबंधीत इतरांच्या शोधात आहेत. फैयाज अहमद, कैझान, झैद विलात्रा व अनुज केशवानी यांच्या अटकेनंतर त्यांच्याशी धागेदोरे जुळलेले तसेच बॉलीवूड वर्तुळात ड्रग्स पुरवठा करणारे डझनभर वितरक आता अंडरग्राऊंड झाले आहेत. यावेळी मिरांडा व शौविक चक्रवर्तीच्या चौकशीत केजेचे नाव पुढे आले होते. नुकतीच याप्रकरणी एनसीबीने अभिनेता अर्जुन रामपालची प्रेयसी गॅब्रिल्लाच्या भावाला ड्रग्ससह अटक केली. खार येथील घरी  अलफ्रॅझोलन गोळ्यांची एक स्ट्रीप सापडली आहे. तो याप्रकरणी अटक करण्यात आलेला रिक्षा चालक संदीप गुप्ता असल्याचा संशय आहे. त्याशिवाय तो याप्रकरणी अटक अनुज केशवानी व ड्वेन यांच्याही संपर्कात असल्याचा संशय आहे. याशिवाय  डेमेट्रीअॅडेट्स याप्रकरणातील आरोपी कैझानलाही ओळखत होता. त्याने   डेमेट्रीअॅडेट्स हशीश व आईसचा पुरवठा केला होता. त्यानंतर याप्रकरणी त्याचा जबाब नोंदवून  एजिसिलाऊस डेमेट्रीअॅडेट्सला अटक करण्यात आली.

Read this story in English
संबंधित विषय