संजय लिला भन्साळीच्या अडचणीत वाढ, सुशांत आत्महत्येप्रकरणी बोलवले चौकशीला

मंगळवारी सुशांतसोबत काम करणारी अभिनेत्री संजना सांघी हिची ७ तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी आता प्रसिद्ध दिग्दर्शन संजय लिला भन्साळीला चौकशीसाठी समन्स केले आहे.

संजय लिला भन्साळीच्या अडचणीत वाढ, सुशांत आत्महत्येप्रकरणी बोलवले चौकशीला
SHARES

बॉलिवूडमधील मोठ्या मीडिया हाऊसेसनी सुशांतला बॅन केल्याची चर्चा होती. याच कारणांवरून त्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचे बोलले जात होते. त्यानुसार पोलिसांनी या  प्रकरणात खरचं घराणेशाही सुरू आहे का ? याचा तपास सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी यशराज फिल्मसला सुशांतसोबतचे क्राँन्ट्रेक्च लेटरची कागदपत्रे जमा करण्यास सांगितले होते. मंगळवारी सुशांतसोबत काम करणारी अभिनेत्री संजना सांघी हिची ७ तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी आता प्रसिद्ध दिग्दर्शन संजय लिला भन्साळीला चौकशीसाठी समन्स केले आहे.  

हेही वाचाः- महाराष्ट्रात ६० पोलिसांचा कोरोनाने मृत्यू

सुशांतसिंह राजपूत याचा अंतिम शवविच्छेदन अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. गळफास घेतल्यानेच सुशांतचा मृत्यू झाल्याचे त्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. आत्महत्ये मागची सर्व कारणे पडताळणी जात आहेत. या प्रकरणात आतापर्यंत २७ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. सुशांतसिंग राजपूतच्या कुटुंबीयांना पुन्हा जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले आहे.सुशांतच्या आर्थिक गुंतवणूक व कंपनीत रिया चक्रवर्ती हिलाही पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुशांतसोबत शेवटात म्हणजेच ‘दिल बेचारा’ मध्येकाम करणारी अभिनेत्री संजना सांघीला पोलिसांनी चौकशीसाठी समन्स केले होते. पोलिसांनी संजनाला सोमवारी चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते. मात्र शुटींगच्या तारखेत व्यस्त असल्यामुळे संजनाने पोलिसांना मंगळवारी चौकशीला हजर राहिली. पोलिसांनी तब्बल ७ तास तिची चौकशी केल्यानंतर तिला जाऊ दिले. काही महिन्यांपूर्वी 'मी-टू कैम्पेन' सुरू असताना संजनाने सुशांतवर तिची छेड काढल्याचा आरोप केला होता. त्यावेळी तिने सुशांतसोबत चॅटचे फोटो ही सोशल मिडियावर टाकल्याचे कळते. त्यावेळी सुशांतने या आरोपाचे खंडन केले होते.

हेही वाचाः- मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचे अध्यक्ष जी वेंकट कृष्णा रेड्डी सह १० जणांवर सीबीआयने नोंदवला गुन्हा

दरम्यान बॉलीवूडमधील अनेक बड्या कंपनींना ज्यांनी सुशांतसोबत काम केलं आहे. तसेच ज्या चित्रपटांमध्ये सुशांत काम करणार होता. मात्र काही कारणांमुळे त्याला ते चित्रपट मिळू शकले नाहीत. अशा कंपनींना त्यांचे कॉन्ट्रॅक्ट सादर करण्याचे  आदेश पोलिसांनी दिले होते. सुशांतने केलेल्या आत्महत्येला बॉलिवूडमधील घराणेशाही कारणीभूत असल्याचा आरोप केला जात होता. या प्रकरण बिहारमध्ये एकताकपूर, संजय लिला भन्साळी, करण जोहर आणि सलमान खानसह ८ जणांवर याचिकाही दाखल केली होती. या आरोपाला संजय लिला भन्साळीकडून पत्राद्वारे उत्तर ही पाठवले होते. त्यात संजय लिला भन्साळी यांनी मी सुशांतला चार चित्रपटात काम करण्याची आँफर केली होती. मात्र सुशांत काम करत असलेल्या चित्रपटांच्या तारखा आणि मी दिलेल्या तारखा या सारख्याच असल्यामुळे त्याने माझी आँफर स्विकारली नसल्याचे कळवले होते. दरम्यान आता वांद्रे पोलिसांनी संजय लिला भन्साळी यांना चौकशीसाठी बोलावल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचाः- राज्यात ३६३ तर मुंबईच १८१ कैद्यांना कोरोनाची लागण, ४ कैद्यांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू

तसेच मंगळवारी सुशांतची बहिण आणि त्याचा मित्र महेश शेट्टी यांनी तपास अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचे ही कळते. दोघांनी सुशांतच्या आत्महत्येचे कारण काही स्पष्ट झाले आहे का हे जाणून घेतल्याचे कळते. त्याच बरोबर सुशांतने आत्महत्या केलेल्या घरात तो भाड्याने रहात होता. त्या घराचे भाडे लाखोरुपये आहे. त्यामुळे ते घर म्हणजे च सुशांतच्या त्या घरातील वस्तू घेऊन ते घर खाली करण्याबाबत पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. त्याच बरोबर सुशांतचे जे बँक अकांऊन्ट पोलिसांनी बंद केले आहेत. ते सुरू करण्याबाबत ही पोलिसांकडे विनंती केल्याचे कळते.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा