'सैराट' प्रेमी युगल पोलिसांच्या हाती

 Borivali
'सैराट' प्रेमी युगल पोलिसांच्या हाती

बोरिवली - गुजरातहून मुंबईला पळून आलेल्या अल्पवयीन प्रेमी युगलाला पश्चिम रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केलंय. लग्न करण्याच्या उद्देशानं हे दोघे घरातून पळाले होते.  

17 वर्षांचा रोहित (बदललेलं नाव) आणि 16 वर्षांची बरखा (बदललेलं नाव) 29 ऑक्टोबरला घरातून पळाले होते. 31 ऑक्टोबरला दोघांना रेल्वे पोलिसांनी पकडलं. चौकशी केल्यानंतर दोघांनी घरातून पळून आल्याचं सांगितलं. तसंच नऊ महिन्यांपासून दोघं एकमेकांवर प्रेम करतायेत. दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. पण घरच्यांचा पाठिंबा नव्हता. त्यामुळे आम्ही दोघांनी घरातून पळून लग्न करण्याचं ठरवलं, असं त्यांनी पोलिसांना सांगितलं.

Loading Comments