Advertisement

Terrorists threaten Taj Hotel मुंबईत पून्हा २६/११ घडवण्याच्या तयारीत अतिरेकी, ताज हाँटेलला दिली धमकी ?

लष्कर ए तोयबाचा सदस्य असून आम्ही लवकरच २६/११ सारखा दहशतवादी हल्ला करणार आहोत, परिणामांसाठी तयार रहा असे धमकीवजा संदेश त्याने दिला.

Terrorists threaten Taj Hotel मुंबईत पून्हा २६/११ घडवण्याच्या तयारीत अतिरेकी,  ताज हाँटेलला दिली धमकी ?
SHARES
Advertisement

पाकिस्तानच्या स्टॅक एक्सचेंजवर अतिरेक्यांनी हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच, आता मुंबईच्या ताज हाँटेलवर पून्हा एकदा २६/११ सारखा दहशतवादी हल्ला घडवण्याची धमकी अतिरेक्यांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे ताज हाँटेलसह मुंबईतल्या प्रमुख ठिकाणांच्या सुरक्षेत  पोलिसांनी  वाढ केली आहे. हा फोन देखील पाकिस्तानमधूनच आला असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी मुंबईचे पोलिस, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे  पोलिस सायबर तज्ञांच्या मदतीने त्या फोनचा मागोवा घेत आहेत.

 हेही वाचाः- मुंबईकरांनो, मास्क घालूनच घराबाहेर पडा, नाहीतर होईल १ हजार रुपयांचा दंड

मुंबईत आधीच कोरोनान संपूर्ण सुरक्षा यंत्रणा कामाला लागली आहे. या महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन शर्तीचे प्रयत्न करत  आहेत. तर दुसरीकडे भारत-चीन मध्येही संबध खराब झाल्यामुळे सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर पाकिस्तान सीमेवर दहशतावद्यांशी जवान दोन हात करत आहे. अशातच एक नवी डोकेदुखीने सुरक्षा यंत्रणेवर भार कामाला लागली आहे. सोमवारी मध्यरात्री ताज हाँटेलला एक निवावी फोन आला. फोनवर समोरील व्यक्तीने तो लष्कर ए तोयबाचा सदस्य असून आम्ही लवकरच  २६/११ सारखा दहशतवादी हल्ला करणार आहोत, परिणामांसाठी तयार रहा असे धमकीवजा संदेश त्याने दिला.  त्यानंतर लगेचच दुसरा फोन हा वांद्रेच्या ताज हाँटेलवर करण्यात आला. या फोनची माहिती हाँटेलच्या संबधित अधिकाऱ्यांनी पोलिसांना दि २ल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तातडीने दोन्ही हाँटेलसह मुंबईतल्या प्रमुख ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिलेले आहेत.

 हेही वाचाः- कोरोनाला टाळण्यासाठी बेस्टची 'क्यूआर कोड'द्वारे भाडं देण्याची सुविधा

या फोनचा मागोवा महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस आणि सायबर पोलिसांनी घेतला असता.  हा फोन पाकिस्तानमधूनच आला असल्याचे कळते. २६ नोव्हेंबर २००८ रोजी देखील रात्रीच्या अंधरात दहशतवाद्यांनी ताजमध्ये घुसून दहशतवादी हल्ला केला होता. या हल्यात १६६ लोक मारले गेले होते. यातील सर्व दहशतवाद्यांना ही पोलिसांनी ठार मारले. त्यातील एक अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश आले होते. त्याला नंतर फाशी देण्यात आली.  

संबंधित विषय
Advertisement