मास्क न घालण्यावरून व्यावसायिकाचा रस्त्यात धिंगाना


मास्क न घालण्यावरून व्यावसायिकाचा रस्त्यात धिंगाना
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सरकारकडून वेळोवेळी मास्क आणि इतर नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात असताना. va 'नो मास्क नो एंट्री' अशा आशयाची जाहिरात स्वत: सरकार कडून केली जात आहे.  काही बेशिस्त नागरिक आज देखील नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. मास्क न घालण्यावरून अनेकदा नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये खटके उडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मरीनड्राइव्ह परिसरात मास्क न घालण्यावरून गुजरातच्या एका व्यापाऱ्याने धिंगाना घातला. ऐवढेच नाही तर, त्यावरून त्याने पोलिसांना धक्काबुक्की देखील केली.  अखेर पोलिसांनी त्याला विविध कलमांखाली अटक केली.

हेही वाचाः- धारावीनंतर दादरमध्येही २४ तासांत कोरोनाचा नवीन रुग्ण नाही

मनीष खेमचंद मुलचंदानी(३६) असे या अटक करण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. मूलचंदानी हा गुजरातमधील सूरत येथील रहिवासी आहे. काही कामानिमित्त तो मुंबईत आला होता. त्यावेळी मरिन ड्राईव्ह येथील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये गेला. त्यावेळी त्याने मास्क घातला नाही. त्यावर हॉटेलच्या कर्मचा-यांनी हटकले. त्यावर संतापलेल्या मूलचंदानीने त्यांना धमकावण्यास सुरूवात केली. अखेर कर्मचा-यांनी पोलिसांना दूरध्वनी करून सांगितले असता पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी आरोपी पोलिसांनाही धमकावू लागला. ‘तुम पुलिस वाले मेरा कुछ नही बिघाड सकते’ पोलिसांशी अशा प्रकारे हुज्जत घातल्यानंतर पारा चढलेल्या पोलिसांनी मुलचंदानी याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस शिपाई संजय पवार यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी मुलचंदानीला भादंवि कलम ३५३, १८८, २६९,१८३,५०४,५०६ सह राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा कलम २००५ च्या कलम ५१  अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा