शिळफाटा इथल्या मंदिरात आश्रय घेतलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार करून खून केल्याप्रकरणी जलद तपास करण्यात येणार आहे. या प्रकरणातील दोषींना शिक्षा व्हावी, यासाठी लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करून खटला जलदगती न्यायालयात चालविला जाईल.
तसेच या प्रकरणात ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे, नवी मुंबई पोलिस आयुक्त आणि गृह विभागाचे प्रधान सचिव यांना दिले.
कलम 498 अ अन्वये गुन्हा दाखल
अत्यंत गंभीर अशी ही घटना असून या संदर्भात ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील शिळफाटा येथे ही घटना घडली आहे. तेथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच महिलेच्या पालकांच्या तक्रारीवरून नवी मुंबई पोलिसात कलम 498अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर महिलेवर सामूहिक बलात्कार करून खून करणाऱ्या दोषींना शिक्षा व्हावी यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाणार आहे. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी याप्रकरणी कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हेही वाचा