प्रसिद्ध अभिनेत्रीचं बनावट फेसबुक अकाऊंट उघडून फसवणूक


प्रसिद्ध अभिनेत्रीचं बनावट फेसबुक अकाऊंट उघडून फसवणूक
SHARES

आईच्या कर्करोगावरील उपचारासाठी पैसे नसल्यानं कर्नाटकच्या एका २५ वर्षीय सिव्हिल इंजिनिअरनं अभिनेत्री दिव्या खोसला कुमार हिच्या नावानं बनावट फेसबुक अकाउंट बनवून फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्रज्ज्वल गोपाळकृष्ण (25) याला गुन्हे शाखा १०च्या पोलिसांनी अटक केली आहे. दिव्याच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट उघडून त्यानं गुजरातच्या शिक्षकाची ४१ लाखांना फसवणूक केल्याचं तपासात उघडकीस आलं आहे. न्यायालयानं प्रज्ज्वलला 10 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


पेपरमधील बातमीने सुचली कल्पना

मूळचा कर्नाटकचा रहिवाशी असलेला प्रज्ज्वल अापल्या कुटुंबियांसोबत बंगळुरूला राहत होता. प्रज्ज्वल हा दिव्या खोसलाचा खूप मोठा फॅन होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्यानं एका पेपरात अशाच एका अभिनेत्याच्या नावानं बनावट फेसबुक अकाऊंट उघडून एका व्यक्तीची फसवणूक केल्याची बातमी वाचली. त्या बातमीने प्रभावित झालेल्या प्रज्ज्वलनेही दिव्याच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट उघडले.

दिव्याच्या फॅनची केली फसवणूक

गुजरातच्या वडाेदरामधील प्रतापनगरमध्ये राहणारा एक शिक्षक दिव्याचा खूप मोठा फॅन होता. त्याने दिव्याच्या त्या बनावट फेसबुक आयडीवर मेसेज केला होता. त्याच्याशी प्रज्ज्वल दिव्या म्हणून बोलत होता. शिक्षकाने अापली एक डाँक्यूमेंट्री शेअर केली होती. त्यावेळी टीसीरिज कंपनीच्या मालकाच्या शिफारशीनुसार नवीन चित्रपटात काम करण्याची अाॅफरला या शिक्षकाला प्रज्ज्वलने दिली. चित्रपटात १ कोटींची गुंतवणूक करावी लागेल, असे त्या शिक्षकाला सांगितले. शिक्षकाने लोण काढून ४१ लाख रुपये जमवले.


महागडी गाडी घेऊन अाला

जमवलेले पैसे घेऊन मुंबईतील अोशिवरा परिसरात भेटण्याचे निमंत्रण दिव्याच्या अकाउंटवरून प्रज्ज्वलने या शिक्षकाला दिले. मात्र दोन चित्रपटाचे शूटिंग असल्याने अापण येऊ शकणार नाही. माझ्या सेक्रेटरीकडे पैसे पाठवून दे, असेही त्याला सांगण्यात अाले. शिक्षकाला विश्वास बसावा, यासाठी प्रज्ज्वल महागडी गाडी घेऊन पैसे स्वीकारण्यासाठी अाला. पैसे स्वीकारल्यानंतर अाता मॅडम तुमच्याशी संपर्क साधतील, असे सांगून प्रज्ज्वलने तिथून पळ काढला.


...अाणि झाली फसवणूक

दोन दिवसांनी त्या शिक्षकाने फोन केला असता, फोन लागत नव्हता. चौकशी केल्यावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. या गुन्ह्यांची गंभीरता लक्षात घेऊन हे प्रकरण गुन्हे शाखा १० कडे वर्ग केला. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ४ एप्रिल रोजी प्रज्ज्वलला बंगळुरूमधून अटक केली. आईला झालेल्या कर्करोगाच्या उपचारासाठी अापण हे कृत्य केल्याचे प्रज्ज्वलने पोलिसांना सांगितले.


हेही वाचा -

सलमान खानची रवानगी तुरूंगात, काळवीट शिकारप्रकरणी ५ वर्षांची शिक्षा

'फटका गँग'ला जीआरपीचा 'दणका'

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा