मास्क न घातल्याप्रकरणी पोलिस आणि पालिकेकडून पहिला गुन्हा दाखल


मास्क न घातल्याप्रकरणी पोलिस आणि पालिकेकडून पहिला गुन्हा दाखल
SHARES

कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू असताना. दुसरीकडे मास्क न लावता वावरणाऱ्या बेशिस्त नागरिकांमुळे इतरांमध्ये कोरोना पसरण्याचे चिंता व्यक्ती केली जात आहे. वारंवार सांगून देखील न ऐकणाऱ्यांविरोधात पोलिस आणि पालिकेकडून आता थेट गुन्हा दाखल केला जात आहे. तर मास्क न घातल्याप्रकरणी दंडात्मक रक्कम देखील दुप्पट केली आहे. गोंवडीत आज या कारवाईचा भाग म्हणून पोलिसांनी पहिला गुन्हा नोंदवला आहे.

हेही वाचाः- Mumbai metro: गुड न्यूज! मुंबई मेट्रो उद्यापासून सुरू

चेंबूर सावली नाका परिसरात बुधवारी चार पालिका कर्मचारी तैनात असताना. दुपारी दीडच्या सुमारास नीलम जंक्शन येथे २८ वर्षीय तरुण मास्क न घालता फिरत असल्याचे पालिका कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी पालिका आणि पोलिसांच्या पथकासह या तरूणाला विचारले असता. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच पालिका कर्मचा-यांशीच हुज्जत घालण्यास सुरूवात केली. अखेर पालिका कर्मचाऱ्यांनी पोलिसांना पाचरण केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तरुणाला गोवंडी पोलिस ठाण्यात घेऊन आले. पोलिस चौकशीत या तरुणाचे नाव राहुल वानखेडे असल्याचे पुढे आले. अखेर पालिका कर्मचा-यांच्या तक्रारीनंतर मास्क न घातल्याप्रकरणी या तरूणावर भादंवि कलम १८८८ व १८६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचाः- मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून सर्तकतेचा इशारा

पालिका व पोलिसांमध्ये झालेल्या संयुक्त बैठकीनंतर प्रथमच मास्क न वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई महापालिकेच्या पथकाने आता पोलिस आणि वाहतुक पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी याप्रकरणी तसे आदेश दिले होते. त्याच बरोबर नगरसेवकांचीही मदत घेण्याच्या सुचना आयुक्तांनी केल्या आहे. दुकानदार, विक्रेते, दुकान-उपहारगृहे इत्यादी ठिकाणी काम करणारे विक्रेते व कर्मचारी, प्रभातफेरीला मास्क न वापरणार्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. आयुक्तांनी अतिरीक्त आयुक्तांसह सहाय्यक अधिकारी आणि रुग्णांच्या अधिष्टात्यांसमवेत पोलिस प्रशानसा सोबत बैठक घेतली.या बैठकिला पोलिस उपायुक्त शहाजी उमप उपस्थीत होते.

हेही वाचाः- बिहारच्या निवडणुकीत शिवसेनेला मिळालं ‘हे’ निवडणूक चिन्ह

सार्वजनिक परिसरांमध्‍ये ‘विना मास्क’ वावरणा-या नागरिकांवर प्रत्‍येक वेळी, प्रत्‍येक ठिकाणी  दंडात्‍मक कारवाई यापूर्वीच सुरु करण्यात आली आहे. यानुसार आजतागायत ४० हजार पेक्षा अधिक नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून, यापोटी रुपये १ कोटी ५ लाखांपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.  दंडात्मक कारवाई ही आता अधिक कठोरपणे राबविण्याचे निर्देश आजच्या बैठकी देण्यात आले. आयुक्तांनी यावेळी आवश्यक कलमानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.सध्या बिना मास्क वावरणा-यांकडून २०० रुपयांचा दंड आकारला जातो.हा दंड ४०० रुपयां पर्यंत वाढविण्याची शक्यता आहे.त्याच पालिका आणि पोलिस सबंधित व्यक्तीवर फोजदारी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा