कारचोरीची अशीही गुरूकिल्ली


कारचोरीची अशीही गुरूकिल्ली
SHARES

वडाळा - वडाळ्यामध्ये एका अज्ञात चोरट्यानं आलिशान कारवर पाळत ठेवून डल्ला मारल्याची घटना उघडकीस आलीय. या रेनॉ डस्टरची किंमत सुमारे 10 ते 12 लाख रुपये आहे. वडाळ्याच्या भक्तीपार्क सोसायटीत राहणारे गोपाळ कृष्ण गिरीधर नेहमीप्रमाणे वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्समध्ये ऑफिसला गेले होते. त्यांचा कार चालक कारमध्येच थांबला होता. गाडीची काच अर्धवट ठेवून तो झोपला होता. हे पाहून एका सराईत चोरट्यानं खिडकीतून हात घालून कारची चावी घेऊन पोबारा केला. दरम्यान गिरीधर घरी जाण्यास निघाले, तेव्हा गाडीला किल्लीच नसल्याचं निदर्शनास आलं. किल्ली शोधूनही सापडत नसल्यानं त्यांनी घरातून दुसरी किल्ली मागवून कार सुरू केली. आदल्या दिवशी ज्या चोरानं किल्ली चोरली होती त्यानेच दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरापासून गाडी चोरली. पोलीस या चोरट्याचा शोध घेत आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा