सुशांत आत्महत्या प्रकरण : सारा, रकुल,सिमोन यांना एनसीबीकडून चौकशीसाठी समन्स पाठवणार

एनसीबी त्यांना या आठवड्यात समन्स बजावून चौकशीला बोलवणार असल्याचे कळते.

सुशांत आत्महत्या प्रकरण : सारा, रकुल,सिमोन यांना एनसीबीकडून चौकशीसाठी समन्स पाठवणार
SHARES

सुशांत सिंग राजपूत (Sushant singh rajput) आत्मत्या प्रकरणाला तीन महिने उलटत आले. मात्र अद्याप सुशांतने आत्महत्या नेमकी का ? केली हे अद्यास गुलदस्त्यात आहेत. सुशांतने नेमकी आत्महत्या केली की,  त्याची हत्या करण्यात आली. यावरून  सध्या आरोप प्रत्यारोप सुरू असताना. सुशांत अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे रिया चक्रवर्तीच्या चौकशीतून पुढे आल्यानंतर एनसीबीने या प्रकरणात २१ जणांना अटक केली. तर  चौकशीत अभिनेत्री सारा अली खान, रकुल प्रीत, डिझायनर सिमोन खंबाटा यांची नावे पुढे आल्यानंतर एनसीबी त्यांना या आठवड्यात समन्स बजावून चौकशीला बोलवणार असल्याचे कळते.

हेही वाचाः- माणकोली उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

रिया चक्रवर्ती ( Riya Chakraborty ) आणि तिचा भाऊ शौविक हे सॅम्युअल मिरांडा तसेच दिपेश सावंतच्या माध्यमातुन ड्रग्ज तस्करांच्या होती. त्यानुसार, एनसीबीने मुंबई आणि गोवा येथे छापे मारले होते. आतापर्यंत याप्रकरणी २१  जणांना अटक केली आहे. एनसीबीच्या चौकशीत रियाने सारा अली खान, रकुल प्रीत, डिझायनर सिमोन खंबाटा यांची नावे पुढे आली असल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले. दरम्यान, त्याच्यापैकी कोणालाही अद्याप समन्स पाठवण्यात आलेला नाही. या आठवड्यात समन्स पाठवण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. रियाने केवळ गांजा आणि एमडी हे ड्रग्ज सुशांतला दिले नाही. तर कोकेनसारखे हाय प्रोफाईल ड्रग्ज देखील वापरल्याचे आत्तांपर्यंतच्या तपासांत समोर आले आहे. तसेच याप्रकरणी अनेक बाॅलिवुड ( Bollywood) सेलिब्रेटीजना समन्स पाठविण्यात येणार आहे. तर काही तस्कराना अटक होण्याची शक्यता असल्याचे एनसीबीने स्पष्ट केले.

हेही वाचाः- मराठा आरक्षणावरची अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी न्यायालयात अर्ज

दरम्यान, एनसीबीच्या पथकाने सुशांतसिंह राजपूतच्या पवना लेक फार्महाऊसवर छापा टाकला आहे. यावेळी त्यांना हुक्काची भांडी, काही औषधे, अॅश ट्रे आणि आणखी ब-याच गोष्टी सापडल्या. सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, घर व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा यांच्यासह अनेक सेलिब्रिटी या फार्महाऊसवर पार्टी करीत असल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे, सुशांतच्या जवळच्या मित्रां व्यतिरिक्त बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीं देखील याठिकाणी पार्टी करण्यास जात होते. दरम्यान, रिया चक्रवर्ती आणि ड्रग पेडलर यांच्यांतल्या संभाषणाचा एक नवा खुलासा झाला आहे. रिया ड्रग डीलरशी बोलण्यासाठी कधीही स्वतःचा फोन वापरत नव्हती.त्यासाठी नात्यातील एका व्यक्तीच्या मोबाईल फोनचा वापर केला जायचा त्याअनुशंगाने याचा अधिक तपास सुरु असल्याचे एनसीबीने सांगितले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा