पोलिसांच्या बदल्यांचं रेटकार्ड बनवणाऱ्याला अटक


पोलिसांच्या बदल्यांचं रेटकार्ड बनवणाऱ्याला अटक
SHARES

पैसे घेऊन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करून देणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश होण्याच्या घटनेला वर्ष उलटत नाही, तोच मे महिन्यात होणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं रेटकार्ड बनवणाऱ्याला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. सर्वेश यादव असं या आरोपीचं नाव आहे. याप्रकरणी न्यायालयानं सर्वेशला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


सरकारी वेबसाईट केल्या हॅक

राज्यातल्या महत्त्वाच्या शासकीय वेबसाईट सर्वेशनं काही दिवसांपूर्वी हॅक केल्या होत्या. या वेबसाईटवरून त्यानं मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे बनावट ई-मेल तयार केले. या ई-मेलवरून त्यानं विविध अधिकाऱ्यांना बदलीचं रेटकार्ड पाठवलं. या रेटकार्डमध्ये चांगल्या बदलीसाठी किती पैसे मोजावे लागतील, याबाबतची माहिती देण्यात आली होती.


पोलीस वर्तुळात खळबळ

या घटनेनंतर पोलीस वर्तुळात खळबळ उडाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पोलिस तपासात या सर्व प्रकरणामागे सर्वेश यादवचा हात असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर सायबर पोलिसांनी त्याला अटक केली. याप्रकरणी आरोपीनं हे सर्व बदली प्रक्रियेत घोळ घालण्याच्या आणि पोलिसांची बदनामी करण्याच्या उद्देशानं केलं असल्याचा संशय पोलिसांना असून त्या अनुषंगानं पोलिसांचा तपास सुरू अाहे.


यापूर्वी चार जणांना अटक

सोलापूर येथील पोलिस उपायुक्त नामदेव चव्हाण यांना जून २०१७ मध्ये अापल्या अावडत्या ठिकाणी बदलीसाठी निनावी फोन आला होता. त्यावेळी चार आरोपींनी चव्हाणांसमोर चांगल्या ठिकाणी बदलीसाठी रेटकार्ड ठेवलं होतं. याबाबत चव्हाण यांनी आपल्या वरिष्ठांना माहिती दिली. त्यांनी मुंबई गुन्हे शाखेतील पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून विलेपार्ले येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या टोळीचा पर्दाफाश केला होता.


हेही वाचा -

रेल्वेचं तिकिट मिळवण्यासाठी 'तो' वापरायचा मंत्र्यांची बनावट शिफारसपत्रं

धक्कादायक! आयफोनचा डेटाही गेला चोरीला

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा