सकाळी वेटर, रात्री चोर!

Oshiwara
सकाळी वेटर, रात्री चोर!
सकाळी वेटर, रात्री चोर!
See all
मुंबई  -  

पंचतारांकीत हॉटेलमध्ये सकाळी वेटरचे काम करून रात्री त्याच हॉटेलमध्ये चोऱ्या करणाऱ्या एका सराईत टोळीला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. संतोष नायक (22) आणि परेश सोरेन (23) अशी या दोघांची नावे असून या दोघांनी तब्बल 19 ठिकाणी अशाप्रकारे चोऱ्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या दोघांकडून साडेसहा लाखांचा ऐवज देखील जप्त केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम उपनगरातील पंचतारांकित हॉटेलमधील चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. त्यात काही हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांच्या हाती लागले होते. पण बहुतांश चोऱ्या रात्रीच्या वेळेस होत असल्याने या चोऱ्यांमागे नेमका कुणाचा हात आहे, याचा उलगडा होत नव्हता. मात्र सोमवारी हॉटेलमध्ये चोऱ्या करणाऱ्या टोळीची माहिती गुप्त खबऱ्याकडून गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी ओशिवरा येथे सापळा रचला. या सापळ्यात दोघेही आराेपी अलगद सापडले.

खार, मालाड, वर्सोवा आदी ठिकाणचे हाॅटेल आणि दुकानांचे टाळे तोडून या दोघांनी चोऱ्या केल्याचे सांगितले. पकडले जाऊ नये यासाठी ते ठराविक महिन्यांनी हॉटेल बदलत असत. सकाळी वेटरचे काम करताना संपूर्ण हॉटेलची रेकी करून मालक पैसे कुठे ठेवतो? सीसीटीव्ही कॅमेरे कुठे आहेत? याची खातरजमा केल्यावर ते रात्रीच्या वेळेत चोरी करून काही दिवसांनी त्या हॉटेलमधली नोकरी सोडून देत असत.

Loading Comments
© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.