राज्यपाल राम नाईकांच्या घरी चोरी करू पाहणारा अटकेत


राज्यपाल राम नाईकांच्या घरी चोरी करू पाहणारा अटकेत
SHARES

यूपीचे राज्यपाल आणि उत्तर मुंबईचे माजी खासदार राम नाईक यांच्या दिंडोशी येथील घरात चोरीचा प्रयत्न करण्याऱ्या भुरट्या चोरांना पोलिसांनी अटक केली आहे.


चोरीची बाब उघड

भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांचं घर दिंडोशी परिसरात आहे. मात्र २०१४ मध्ये राम नाईक यांची उत्तर प्रदेश राज्याच्या राज्यपालपदी नेमणूक झाल्यानंतर त्यांचा मुंबईतील वावर कमी झाला. कालांतराने दिंडोशी येथील घराचा कार्यालय म्हणून वापर होऊ लागला. दरम्यान गुरुवारी राम नाईकांच्या या कार्यालयात तीन भुरट्या चोरांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही चोरीची बाब उघडकीस आली.


आरोपाला पकडलं

स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने या तीन चोरांपैकी एकाला पकडले असून इतर दोन चोर मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले. गोरा सिंग ठाकूर (३५) असं या आरोपीचं नाव आहे. त्याच्या विरोधात दिंडोशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस गोरा सिंगच्या मदतीने इतर दोन आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा