अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तृतीयपंथीला अटक


SHARE

चारकोप परिसरात एका तृतीयपंथीकडून एका मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. एकनाथ शिंदे असं या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. एकनाथच्या अशा वागणुकीमुळे तो खरंच तृतीयपंथी आहे की, त्याने पेहरावा केला. हे आता पोलिस पडताळत आहेत.


स्थानिकांनी शिंदेला चोपलं

चारकोपच्या आनंदीबाई केणी चाळीत गुरुवारी सकाळी एकनाथ आणि त्याच्यासोबत दोन ते तीन तृतीयपंथी घराघरात पैसे मागत फिरत होते. त्यावेळी एकनाथ शिंदे हा पीडित मुलीच्या दारात आला. त्याने घरात पैशांसाठी मागणी केली. त्यावेळी पीडित मुलीगी घरात नुकतीच औषध घेऊन झोपली होती. शिंदेच्या आवाजाने पीडित मुलीने घरात कुणी नसल्याचं सांगितलं. 

याच संधीचा फायदा घेऊन शिंदे घरात शिरला आणि त्याने दरवाजाची कडी आतून बंद केली. तितक्यात त्या मुलीची मोठी बहीण तिथे आली आणि तिने दरवाजा ठोठावला. तेव्हा शिंदेने दार उघडल्याचं पाहून आरडाओरड सुरू केली. त्यावेळी झालेल्या मोठा आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत शिंदेला चांगलाच चोप दिला.


...की निव्वळ बनाव

स्थानिकांनी या घटनेची माहिती चारकोप पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर शिंदेसोबत असलेल्या इतर तृतीयपंथीनी तेथून पळ काढला. दरम्यान पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

'शिंदे खरच तृतीयपंथी आहे की निव्वळ बनाव करत आहे, हे वैद्यकीय चाचणीनंतर स्पष्ट होईल. मात्र, त्याच्यावर आम्ही पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या