मुलीनेच रचले अपहरण नाट्य


मुलीनेच रचले अपहरण नाट्य
SHARES

एक शाळकरी मुलगी शाळेतील तळमजल्यावर असलेल्या स्वच्छतागृहात जाण्यास निघते. अचानक तोंडाला रुमाल बांधलेले दोन अनोळखी व्यक्ती तिच्या समोर येतात. ते दोघेही तिचे तोंड दाबून बळजबरीने तिला रिक्षात बसवतात आणि तिला पळवून नेण्याचा प्रयत्न करतात. मात्र मुलगी भलतीच धाडसी निघते. ती आरोपींच्या हाताचा चावा घेत स्वत:ची सहिसलामत सुटका करून घरी परतते. 

अगदी सिनेमात शोभावी अशी ही घटना, प्रत्यक्षात घडल्याचे सांगत घटकोपरमधील एका शाळकरी मुलीने तिची आई, शाळा आणि पोलिसांनाही वेड्यात काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांच्या तपासात ही घटना म्हणजे मुलीने रचलेले अपहरण नाट्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.


का रचले अपहरण नाट्य?

सोमवारी घाटकोपरच्या भटवाटी महापालिका शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आपले अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली होती. या वृत्ताने परिसरात खळबळ उडाली होती. पण पोलीस तपासात या मुलीने अपहरणाचा बनाव रचल्याचे पुढे आले. 

ही मुलगी खैरानी रोड येथील जंगलेश्वर मंदिर परिसरात राहात असलेल्या आपल्या आजीला भेटण्यासाठी गेली होती. तिला रात्री घरी येण्यास उशीर झाला होता. पण आईला काय कारण द्यायचे? या विचारातून तिने आपले अपहरण झाले होते. पण अपहरणकर्त्यांच्या तावडीतून आपण सुटून पळ काढल्याची खोटी कहाणी आईला सांगितली. त्यानंतर या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली. याबद्दल घाटकोपर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर मुलीने खरी हकीगत सांगितली.

टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या गुन्हेविषयक मालिकांमुळे लहान मुलांच्या विचार प्रक्रियेला जणू प्राधान्य मिळताना दिसत आहे. याच कल्पनाशक्तीतून घाटकोपरच्या भटवाडी परिसरात राहणाऱ्या १३ वर्षाच्या विद्यार्थिनीने आपल्या अपहरणाचे नाट्य रचल्याचे म्हटले जात आहे.  



हेही वाचा - 

मुलीचे अपहरण करणारी 'ती' महिला गजाआड

सीएसटीवरचं अपहरण नाट्य !


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा