माॅडेलला अश्लिल मेसेज करून धमकी

मुंबईतल्या ओशिवरा परिसरात राहणाऱ्या २८ वर्षीय माॅडेलला अश्लील मेसेज पाठवून धमकावण्यात आल्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी माॅडेलने ओशिवरा पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

माॅडेलला अश्लिल मेसेज करून धमकी
SHARES

मुंबईतल्या ओशिवरा परिसरात राहणाऱ्या २८ वर्षीय माॅडेलला अश्लील मेसेज पाठवून धमकावण्यात आल्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी माॅडेलने  ओशिवरा पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

मूळची हरियाणाच्या गुडगावची राहणारी असलेली माॅडेल मुंबईच्या ओशिवरा परिसरात तिच्या मित्रासोबत राहते. पीडित माॅडेल ४ मे रोजी दुपारी ओशिवराच्या मेगा माॅलजवळ खरेदी करत असताना तिला त्याच्या मोबाइलवर एका अनोळखी व्यक्तीच्या मोबाइलवरून अश्लील मेसेज आला. त्याला जाब विचारण्यासाठी माॅडेलने फोन केला असता समोरील व्यक्तीने काही न ऐकताच माॅडेलला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.

हे ऐकून माॅडेलने फोन कट केला. त्यानंतर त्याच नंबरवरून तिला वारंवार अश्लील मेसेज आणि धमकी देण्यात आली. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचं लक्षात येताच, माॅडेलने ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. हेही वाचा-

रिक्षावाल्याने चोरला विंदू दारासिंगच्या पत्नीचा मोबाइल

मुंबईत व्हायला आला हिरो, बनला चोर!Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा