पंतप्रधान मोदींवर चित्रपट बनवणा-या सहनिर्मात्याला धमकी

त्यात शेलक्या भाषेचा वापर करण्यात आला असून वाधवानी यांच्या कुटुंबातील महिलांना गॅगरेप करण्याची धमकी दिली आहे.

पंतप्रधान मोदींवर चित्रपट बनवणा-या सहनिर्मात्याला धमकी
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर चित्रपट तयार करणारा सहनिर्माता अमित वाधवानी याला धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुशांतच्या मृत्यूला जबाबदार धरत माथेफिरू आरोपीने वाधवानीच्या घरातील महिला सदस्यांवर सामुहिक बलात्कार करण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चेंबूर पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.  

हेही वाचाः- बाॅलिवूडला संपवण्याचे प्रकार सहन करणार नाही- उद्धव ठाकरे

सध्या वाधवानी यांचा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यामुळे हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात येत आहे. याबाबत १० ऑक्टोबरला त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून माहिती दिली होती. त्यावेळी ऑप्टीमिस्टीक नावाच्या प्रोफाईलवरून त्यांना आक्षेपार्ह टिप्पणी येण्यास सुरूवात झाली. आठ आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्या आहेत. त्यात शेलक्या भाषेचा वापर करण्यात आला असून वाधवानी यांच्या कुटुंबातील महिलांना गँगरेप करण्याची धमीक दिली आहे. त्याचा स्क्रीनशॉर्ट काढून वाधवानी यांनी तक्रार केली आहे. १२ ऑक्टोबरला वाधवानी यांनी याप्रकरणी सायबर सेलकडे तक्रार केली होती. त्यांनी चेंबूर पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार करण्यास सांगितले. त्यानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

           
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा