निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र बाळगणारे तिघे अटकेत

अंधेरीत परिसरात काही जण घातक शस्त्र घेऊन लूट करण्यासाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक परमेश्वर गणमे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अंधेरीच्या एम.ए.रोडवर पाळत ठेवून संशयित हालचालीवरून राॅबीन दास याला ताब्यात घेतलं.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र बाळगणारे तिघे अटकेत
SHARES

 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी १४४ आणि शस्त्रबंदीचे आदेश लागू केले आहेत. त्यामुळे पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. अंधेरी परिसरात पोलिसांनी विकास अटवाल, राॅबीन दास या दोघांना देशी कट्टा आणि पाच जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. तर ट्राॅम्बेच्या चित्ता कॅम्प परिसरातून मोहम्मद आलम हासीम शेख यालाही पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसासह अटक केली आहे. या तिघांनाही न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

अंधेरीत परिसरात काही जण घातक शस्त्र घेऊन लूट करण्यासाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक परमेश्वर गणमे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अंधेरीच्या एम.ए.रोडवर पाळत ठेवून संशयित हालचालीवरून राॅबीन दास याला ताब्यात घेतलं. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना देशी कट्टा आणि पाच जिवंत काडतुसं आढळून आली. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने तो मूळचा कोलकत्ताचा रहिवाशी असल्याचे सांगून शस्त्र तस्करीसाठी मुंबईत आल्याचं सांगितलं. 

तर दुसरीकडे विकास अटवाल याला देशी कट्टासह जोगेश्वरीच्या आनंदनगर येथील पाटीलपूत्र येथून अटक केली आहे. तसंच ट्राॅम्बेच्या चित्ता कॅम्प परिसरातून मोहम्मद आलम हासीम शेख याला देशी कट्टा आणि काडतुसासह  अटक केली आहे. शस्त्र घेऊन मोहम्मद रात्रीच्या वेळी संशयितरित्या फिरत होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला हटकले असता तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करून त्याला अटक केली. मोहम्मदने हे शस्त्र कशा करता आणले होते याची पोलिस माहिती घेत आहेत.   

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निर्भय, शांततापूर्वक, न्याय वातावरणात सुरळीत पार पाडण्याकरिता निवडणूक कालावधीमध्ये शस्त्र अथवा हत्यारे, दारूगोळा यांचा गैरवापर होऊन कोणतेही अनुचित घटना घडू नये तसंच मानवी जिवीत हानी किंवा सुरक्षिततेला व सरकारी मालमत्तांना धोका पोहचू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७९ च्या कलम १४४ अंतर्गत आदेश पारीत केले आहेत. 



हेही वाचा -

गोवंडीत माथेफिरूच्या हल्ल्यात १ ठार, ३ जखमी

निलंबित पोलिस अधिकारी १२ वर्ष करत होता उजबेकिस्तान महिलेवर बलात्कार




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा