काशी मिरा भागातून जुन्या नोटांसह तिघे अटकेत

Mira Bhayandar
काशी मिरा भागातून जुन्या नोटांसह तिघे अटकेत
काशी मिरा भागातून जुन्या नोटांसह तिघे अटकेत
काशी मिरा भागातून जुन्या नोटांसह तिघे अटकेत
See all
मुंबई  -  

काशी मिरातल्या गुन्हे शाखेने चलनातून बाद झालेल्या एक हजार आणि पाचशेच्या 28 लाख रूपये किंमतीच्या जुन्या नोटांसह तिघांना अटक केली आहे. या आरोपींनी या नोटा कोठून आणल्या आणि ते या नोटा कोठे नेत होते, याचा तपास पोलीस करत आहेत.

पकडले गेलेल्या आरोपींमधील शाहरुख सलीम मर्चेंट हा मिरा रोडमधील गौरव गॅलेक्सी इमारतीतला रहिवासी आहे तर मंगेश गंगाराम गोटल हा भाईंदरचा तर दीपक पांडुरंग खाड्ये बोरीवलीतला रहिवासी आहे. आरोपींकडे इतक्या जुन्या नोटा आल्या कुठून याचा तपास पोलीस करत आहेत. एलसीबीचे पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांनी सांगितलं की, ठाण्यात मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा आढळून येत असल्याने पोलीस अधिक्षक महेश पाटील यांनीसतर्क राहण्याची सूचना दिली होती. मिरा रोडच्या विजयनगर भागातील अंबर प्लाझा हॉलमध्ये हे तिघे आरोपी सोमवारी जुन्या नोटा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी दुपारी 3.30 वाजता सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी केली असता एक हजारच्या दहा लाखांच्या जुन्या नोटा आढळल्या. त्यानंतर शाहरुखच्या होंडा एक्टिव्हा या दुचाकीत 500 आणि एक हजाराच्या 18 लाख 10 हजाराच्या जुन्या नोटा आढळून आल्या.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.